तुमच्या शहरात डिझेलचा नेमका भाव काय?, उद्यापासून किती रुपयांना मिळणार?
नवी दिल्ली: मोदी सरकारने (Modi Govt) दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर पेट्रोल-डिझेलचे दर कमी करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर हे प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकाराने आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय उद्यापासून (4 नोव्हेंबर) संपूर्ण देशात लागू होणार आहे. यावेळी […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: मोदी सरकारने (Modi Govt) दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर पेट्रोल-डिझेलचे दर कमी करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर हे प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकाराने आता पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे.
ADVERTISEMENT
सरकारने घेतलेला हा निर्णय उद्यापासून (4 नोव्हेंबर) संपूर्ण देशात लागू होणार आहे. यावेळी पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 5 रूपये तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रूपयांनी कमी करण्यात आलं आहे.
दरम्यान, असं असलं तरी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात डिझेलचे वेगवेगळे दर आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्या शहरात डिझेलचे किती दर आहेत आणि सरकारच्या निर्णयानंतर डिझेल किती स्वस्त होणार हे पाहूयात सविस्तरपणे.
हे वाचलं का?
डिझेलचे आजचे (3 नोव्हेंबर) दर
-
अहमदनगर – 105.18 रुपये
ADVERTISEMENT
अकोला – 104.74 रुपये
ADVERTISEMENT
अमरावती – 106.08 रुपये
औरंगाबाद – 106.44 रुपये
भंडारा – 105.35 रुपये
बीड – 105.86 रुपये
बुलढाणा – 105.03 रुपये
चंद्रपूर – 105.78 रुपये
धुळे – 104.66 रुपये
गडचिरोली – 106.17 रुपये
गोंदिया – 106.49 रुपये
बृहन्मुंबई – 106.62 रुपये
हिंगोली – 106 रुपये
जळगाव – 105.21 रुपये
जालना – 106.48 रुपये
कोल्हापूर – 105.06 रुपये
लातूर – 105.76 रुपये
मुंबई – 106.62 रुपये
नागपूर – 104.81 रुपये
नांदेड – 107.67 रुपये
नंदुरबार – 105.47 रुपये
नाशिक – 105.17 रुपये
उस्मानाबाद – 105.92 रुपये
पालघर – 105.16 रुपये
परभणी – 107.20 रुपये
पुणे – 104.78 रुपये
रायगड – 105.43 रुपये
रत्नागिरी – 106.96 रुपये
सांगली – 105.18 रुपये
सातारा – 105.48 रुपये
सिंधुदुर्ग – 105.79 रुपये
सोलापूर – 105.69 रुपये
ठाणे – 104.79 रुपये
वर्धा – 105.28 रुपये
वाशिम – 105.60 रुपये
यवतमाळ – 106.28 रुपये
पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या, चांदीची मस्ती उतरवली, सुबोध भावेने केंद्र सरकारवर साधला निशाणा
हे डिझेलचे आजचे म्हणजेच 3 नोव्हेंबरचे दर आहेत. यामध्ये सरकारच्या निर्णयानंतर 10 रुपयांची कपात ही निश्चित आहे. मात्र, उद्या सकाळी तेल कंपन्या डिझेलच्या दरात वाढ करतात की घट करतात त्यावर नेमके दर निश्चित होणार आहेत. मात्र, आजच्या तुलनेत डिझेल उद्या नक्कीच स्वस्तात मिळणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT