भारतात कोरोनाची तिसरी लाट उच्चांक कधी गाठणार? कधी संपणार कहर? IIS च्या संशोधकांनी दिलं उत्तर
भारतात कोरोना वेगाने पुन्हा एकदा हात पाय पसरतो आहे. देशात मागच्या चोवीस तासात 1 लाख 17 हजार 100 नवे रूग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनचे देशात एकूण 3007 रूग्ण आहेत. यापैकी 1199 लोक बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र आता तिसरी लाट कधी येणार याबाबत IIS च्या संशोधकांनी उत्तर दिलं आहे. भारतीय विज्ञान […]
ADVERTISEMENT

भारतात कोरोना वेगाने पुन्हा एकदा हात पाय पसरतो आहे. देशात मागच्या चोवीस तासात 1 लाख 17 हजार 100 नवे रूग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनचे देशात एकूण 3007 रूग्ण आहेत. यापैकी 1199 लोक बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र आता तिसरी लाट कधी येणार याबाबत IIS च्या संशोधकांनी उत्तर दिलं आहे. भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय सांख्यिक संस्था बंगळुरू यांनी एक स्टडी रिपोर्ट समोर आणला आहे.
कधी असणार तिसऱ्या लाटेचा उच्चांक?
या संशोधकांनी असं म्हटलं आहे की कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्याच्या मध्यात येऊ शकते. या अभ्यासात असंही म्हटलं आहे की कोरनाची लाट ही मार्चच्या अंतापर्यंत हळूहळू कमी होत जाईल. ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि कोरोना रूग्ण वाढत असल्याने कोरोनाची तिसरी लाट आणि त्याचा उच्चांक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात येईल आणि मार्च महिन्याच्या शेवटापासून हळूहळू कोरोना उच्चांक कमी होऊ लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर लसीकरण झालं असलं तरीही पुन्हा संक्रमित होणाऱ्या रूग्णांमध्ये वाढ होऊ शकते असंही या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आलं आहे.