गावकडल्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी राहायला मिळणार?: संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यातील विधानपरिषद निवडणूक ही प्रचंड चुरशीची झाली आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. यामुळे आता सर्वच पक्षाने आपल्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. पण याच गोष्टीचं समर्थन करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की, ‘गावकडच्या आमदारांना इथं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी राहायला मिळणार, ही एक व्यवस्था असते.’

ADVERTISEMENT

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात ठेवलं आहे. यावेळी या आमदारांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. याच गोष्टीवरुन आता सर्वच पक्षांवर टीका केली जात आहे. पण याबाबत संजय राऊत यांनी आपली बाजू मांडतांना समर्थन केलं आहे.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

‘महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे, चांद्यापासून-बांद्यापर्यंत, प्रवासाच्या सुविधा आणि अनेक अडचणी यांतून त्यांना एकत्र मतदान करता यावं, त्यांना मार्गदर्शन करता यावं. मतदान कशारितीने करावं, काय करावं यासाठी त्यांना एकत्र बोलावलं जातं. तसंच गावकडल्या आमदारांना इथं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कधी राहायला मिळणार? खरं तर ही एक व्यवस्था आहे.’ असं म्हणत संजय राऊत यांनी हॉटेल्स पॉलिटिक्सचं समर्थन केलं आहे.

Sanjay Raut: देशाचं राजकारण प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर उभं आहे, हे श्रेय शिवसेनेचं

ADVERTISEMENT

शिवसेनेचे आमदार हे पवईतील रेनिसन्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. तर राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपने आपले आमदार ताज हॉटेलमध्ये ठेवले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ट्रायडेंट हॉटेलमध्ये आहेत तर काँग्रेसचे आमदार 4 सिझनमध्ये आहेत.

ADVERTISEMENT

या सगळ्या आमदारांना 2-3 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या आमदारांवर आता कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. ज्यावरुन राज्यभरात टीका सुरु आहे.

महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून आणण्याासाठी तीनही पक्षांचा प्रयत्न असणार आहे. पण यावेळी तीनही पक्षाची भूमिका एकमेकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. अशावेळी मुख्यमंत्री शिवसेना आमदारांना नेमका काय आदेश देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे हे सावधगिरीचा उपाय म्हणून शेवटच्या क्षणी उमेदवारांचा कोटा ठरवणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत झालेला दगाफटका लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी ही भूमिका घेतली आहे. या सगळ्या निवडणुकीसाठीच राज्यातील चारही प्रमुख पक्षांचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT