एकनाथ शिंदे यांचं बंड कुठल्या दिशेने जाणार? काय आहेत सात शक्यता?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे तो एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलंय. शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राजकीय पेच राज्यात निर्माण झाला आहे. २१ जूनला हे बंड पुकारण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सगळे आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत. शिवसेना आता काय करणार उद्धव ठाकरे हे आव्हान कसं पेलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Eknath Shinde: उद्धव ठाकरे सरकार वाचवू शकतील का? महाराष्ट्र विधानसभेचं गणित प्रचंड रंजक

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राशी फेसबुकद्वारे संवाद साधत बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं मी राजीनामा देतो हवंतर पक्षप्रमुख पदही सोडतो असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदेंसोबत गेल्याची दृश्यं समोर आली आहेत. संजय राऊत यांनी महाविकास आघाडी फ्लोअर टेस्टला सामोरी जायला तयार आहे असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आता हा सगळा पेच निर्माण झाल्यानंतर नेमकं राज्यात काय होणार याच्या विविध प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त होणार का? भाजप पुन्हा सत्तेत येणार का? बंडखोर आमदारांवर कारवाई होणार का हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही राज्यात काय घडू शकतं याच्या सात शक्यता सांगणार आहोत.

ADVERTISEMENT

शक्यता क्रमांक १

ADVERTISEMENT

शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. जर एकनाथ शिंदे ३७ आमदार किंवा त्यापेक्षा जास्त आमदारांचा गट म्हणजेच आमदारांच्या संख्येच्या दोन तृतीयांश आमदारांची एकजूट करण्यात यशस्वी झाले तर तर त्यांच्या गटावर पक्षांतर बंदीच्या कायदान्वये कारवाई होणार नाही. तसं घडल्यानंतर भाजप अविश्वास प्रस्ताव आणला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने जर भाजपला पाठिंबा दिला तर महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजपची सत्ता येईल.

शक्यता क्रमांक २

जर भाजपने अविश्वास प्रस्ताव आणला त्यानंतर जर एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केलं तर ती मतं अयोग्य ठरवली जातील. या जागांवर पुन्हा निवडणूक होईल. त्यानंतर शिवसेनेचं भवितव्य अयोग्य ठरणाऱ्या आमदारांच्या संख्येवर अवलंबून असेल.

तिसरी शक्यता

जर बंडखोर आमदारांनी राजीनामा दिला तर सभागृहातील सदस्यांची संख्या कमी होईल. त्यानंतर सरकारचं भवितव्य हे राजीनामा देणाऱ्या आमदारांच्या संख्येवर अवलंबून असेल.

चौथी शक्यता

एकनाथ शिंदे हे भाजपचं समर्थन घेत मुख्यमंत्री होतील, जर त्यांनी ३७ आमदारांचा गट जमवला तर ते कारवाईपासून वाचू शकतात. ३७ आमदारांना घेऊन त्यांना पक्ष स्थापन करावा लागेल किंवा भाजपसोबत जावं लागेल.

पाचवी शक्यता

जर एकनाथ शिंदे ३७ आमदार एकवटण्यात यशस्वी झाले नाहीत तर त्यांचं बंड थंड होऊ शकतं. असं घडलं तर काही आमदार हे शिवसेनेत परततील तसं झालं तर महाविकास आघाडी सरकार तरू शकतं.

सहावी शक्यता

राज्यातली राजकीय स्थिती पाहता राज्यपाल हे या संबंधीचा रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवू शकतात. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.

सातवी शक्यता

राज्यात पुन्हा एकदा निवडणूक म्हणजेच मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात विधानसभा भंग होण्याच्या दिशेने राजकारणाचा प्रवास असं त्यांनी म्हटलं आहे. तसं घडलं तर महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका होतील.

महाराष्ट्रातही ‘खेला होबे’! गोवा ते बिहार… आतापर्यंत कुठे कुठे झालंय ‘ऑपरेशन लोटस’?

महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते आहे. राज्यात राजकीय भूकंप आलेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तसंच राज्यात पुन्हा एकदा बैठकांचं सत्र पाहण्यास मिळतं आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण २८८ आमदार आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षाकडे १४५ जागा आमदरांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे समर्थन आहे. यापैकी राष्ट्रवादीचे ५३ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. शिवसेनेच्या ५६ आमदारांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना केवळ २५ आमदारांचीच गरज आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी आता आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केलाय. यामध्ये शिवसेनेचे ३३ आमदार असून इतर समर्थन करणाऱ्या अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT