Jogendra kawade : हाजी मस्तानसोबत पार्टी काढणारा नेता एकनाथ शिंदेंसोबत

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जोगेंद्र कवाडे… (Jogendra kawade) दलित चळवळीतलं एक मोठं नाव! जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना आघाडी करत असल्याची घोषणा केली. एकनाथ शिंदेंसोबत आघाडी करणारे जोगेंद्र कवाडे नेमके कोण आहेत? (who is Jogendra kawade) त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि आजपर्यंतची कारकीर्द कशी आहे? (Jogendra kawade political biography) याचा घेतलेला हा आढावा…

जोगेंद्र कवाडे यांचा जन्म 1 एप्रिल 1943 नागपूरला झाला. ते दलित चळवळीतले प्रमुख नेते आहेत. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1976 पासूनच त्यांनी बौद्ध धर्मीयांच्या सवलतींसाठी आंदोलनं केली. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी त्यांचं आंदोलन सर्वाधिक गाजलं. त्यांनी १९७९ ला हजारो आंबेडकरवादी तरुणांना सोबत घेऊन नागपुरातल्या दीक्षाभूमीवरून ते औरंगाबादपर्यंत लाँगमार्च काढला होता.

सरकारलाही या लाँगमार्चची दखल घ्यावी लागली होती. म्हणून ज्या ज्यावेळी नामांतर चळवळीचा इतिहास सांगितला जातो त्यामध्ये जोगेंद्र कवाडे यांचं नाव आधी सांगितलं जातं. त्यांनी ८० च्या दशकात दलित मुक्ती सेनेची स्थापना केली.

ADVERTISEMENT

कवाडे सामाजिक, दलित चळवळींसोबतच राजकारणातही सक्रीय आहेत. ते १९९८ ला चिमूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या तिकीटावर निवडून गेले होते. त्यानंतर पक्षात काही मतभेद झाले. त्यामुळे कवाडेंनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना केली, जो भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष आहे.

ADVERTISEMENT

जोगेंद्र कवाडे यांच्या राजकीय कारकीर्दीतली एक महत्वाची घटना म्हणजे त्यांनी मुंबईतला डॉन हाजी मस्तानसोबत पक्ष काढला होता, त्यांचं नाव होतं, दलित-मुस्लीम सुरक्षा महासंघ… जोगेंद्र कवाडे हे या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते, तर हाजी मस्तान सहअध्यक्ष होता.

दोघांनी मिळून लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढल्याचं स्वतः जोगेंद्र कवाडे अनेकदा सांगतात. त्यावेळी हिंदू-मुस्लीम मतांची व्होट बँक एकत्र आणून काँग्रेसला धक्का द्यायचा, अशी त्यांची रणनिती होती. याच रणनितीवर लढलेली १९८४ सालची औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातली निवडणूक चांगलीच गाजली होती. या निवडणुकीत कवाडे आणि हाजी मस्तानच्या उमेदवारानं तब्बल ४० हजार मतं घेतली होती. त्यामुळे राजीव गांधी यांचा उमेदवार पराभूत झाला होता.

जोगेंद्र कवाडे यांची गडकरींसोबतही जवळीक दिसली होती. त्यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षानं नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नितीन गडकरींना पाठिंबा दिला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT