उद्धव ठाकरेंची वेगळी भूमिका! सुप्रिया सुळेंसह तीन नावांची महाराष्ट्रात पुन्हा चर्चा
उद्धव ठाकरेंनी महिलेला मुख्यमंत्री करूयात अशी अनपेक्षित आणि वेगळी भूमिका मांडली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकणारी पहिली महिला कोण असू शकते? ही चर्चा पुन्हा सुरू झाली. खरंतर… महाराष्ट्राला याआधीच महिला मुख्यमंत्री मिळायला हव्या होत्या, असा एक सूर कायम उमटत आलाय. महाराष्ट्राची स्थापना होऊन 62 वर्ष लोटली आहेत, तरीही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आतापर्यंत महिला […]
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनी महिलेला मुख्यमंत्री करूयात अशी अनपेक्षित आणि वेगळी भूमिका मांडली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकणारी पहिली महिला कोण असू शकते? ही चर्चा पुन्हा सुरू झाली. खरंतर… महाराष्ट्राला याआधीच महिला मुख्यमंत्री मिळायला हव्या होत्या, असा एक सूर कायम उमटत आलाय. महाराष्ट्राची स्थापना होऊन 62 वर्ष लोटली आहेत, तरीही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री का होऊ शकल्या नाही? उद्धव ठाकरे म्हणाले त्यानुसार जर महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाल्या, तर त्या कोण असतील… महाराष्ट्रातील महिला राजकारण्यांना याबद्दल काय वाटतं? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा वेध…
देशातल्या विविध राज्यात आतापर्यंत 16 महिलांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. पण, त्यासाठीही देशाला 16 वर्ष वाट पाहावी लागली. 1963 ला सुचेता कृपलानी देशातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर अनेक मोठ्या राज्याचा कारभार महिलांनी सांभाळला. यात मायावती, उमा भारती, ममता बॅनर्जी, सुषमा स्वराज, जयललिता ही काही उदाहरणं आहेत.
उत्तर प्रदेश, बिहारपासून इकडे दक्षिणेत तमिळनाडूपर्यंत अशा 14 राज्यांची मुख्यमंत्री पदावर महिला विराजमान झाल्या आहेत. पण, यात पुरोगामी महाराष्ट्राचं नाव कुठेच नाही. मग… महाराष्ट्रात आतापर्यंत महिलेला मुख्यमंत्रीपदाची संधी का मिळाली नाही?
मुख्यमंत्री व्हावं म्हणून उद्धव ठाकरेंवर रश्मी ठाकरे ओरडल्या?; रामदास कदमांनी काय म्हटलंय?