Pankaja Munde: ‘मी त्यांचा अपमान का करु?’, Pritam Munde यांच्या मंत्रिपदावरुन पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर मुंडे समर्थकांची नाराजी चांगलीच उफाळून आली. बीडमधील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे आपल्या नाराज झालेल्या कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे यांनी मुंबईतील वरळी येथील निवासस्थानाजवळ त्यांनी जाहीर संवाद साधला.

ADVERTISEMENT

यावेळी पंकजा मुंडे यांनी कुणावरही थेट हल्लाबोल केला नाही. मात्र, आपल्या खास शैलीतून त्यांनी पक्षातील विरोधकांना बरेच खडे बोल सुनावले आहेत. याच वेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याबाबत देखील खंत व्यक्त केली. तसंच त्यांनी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्याविषयी देखील भाष्य केलं.

पाहा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या:

हे वाचलं का?

‘योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा? मंत्रिपदासाठी प्रीतम ताईंचं नाव असताना आणि लायक असताना देखील प्रीतम ताईंच्या मंत्रिपद झालं नाही. पण डॉक्टर कराडांचं झालं. माझं वय 42 आहे त्यांचं वय 65 आहे. मी वयाच्या 65व्या वर्षी मंत्रिपदी विराजमान झालेल्या माझ्या समाजाच्या माणसाचा अपमान करावा हे संस्कार आहेत का माझे? मी कशामुळे त्यांच्या या पदाला अपमानित करु?’ असा सवाल यावेळी पंकजा मुंडे यांनी विचारला.

पाहा आपल्या भाषणात पंकजा मुंडे नेमकं काय-काय म्हणाल्या:

ADVERTISEMENT

  • तुमचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही, मुंडे साहेबांनी खस्ता खाऊन वंचितांना संधी देण्याचं काम केलं. राजकारणात आणण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. परळीची आमदार म्हणून मला त्यांनी राजकारणात आणलं, प्रस्थापितांसोबत त्यांनी युद्ध केलं. म्हणून मला त्यांनी राजकारणात संधी दिली. माझे घरचे ऐशोआरामात राहणार असं चालणार नाही.

ADVERTISEMENT

  • मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही. प्रीतम मुंडे हा माझा परिवार नाही. तर साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता माझा हा माझा परिवार आहे.

    • माझं भांडण नियतीशी, नियतीने आमच्या तोंडचा घास हिरावून घेतला. संघर्षयात्रेत असताना कोणाचं नेतृत्व येणार हे मला माहिती होतं. राज्यात भाजपची सत्ता आली पाहिजे हे मुंडे यांचं स्वप्न होतं. मी लालची नाही, मला सत्तेची लालसा नाही.

    • तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कसं जगू, आमदारकीला मी हरले याचं मला दुःख नाही. अनेकांना माझ्या नावावर लोकांनी निवडून दिलं आहे.

    • आम्ही कधीच कोणाच्या समोर काहीही मागितलं नाही. मला दिल्लीत कोणीही झापलं नाही, मोदींनी सन्मानपूर्वक वागणूक दिली. नड्डा साहेबांनी विश्वास दाखवला, तुम्ही कार्यकर्त्यांची समजून काढा असंही त्यांनी मला सांगितलं.

    Pankaja Munde यांचं दबावतंत्र नाही, त्या वेगळा निर्णय घेणार नाहीत – BJP नेत्यांचं स्पष्टीकरण

    • पांडवांनी धर्मयुद्ध जिंकलं, जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो. मी देखील जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तो प्रयत्न करते. कारण माझेच सैनिक आडवे पडतील.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT