राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंमुळे हितेंद्र ठाकूर शिवसेनेपासून दूर जाणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणूक १० जून रोजी होणार आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. एकही मत फुटू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स पाहण्यास मिळतं आहे. अशात मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी ते एकनाथ शिंदेंवर चांगलेच नाराज असल्याचं म्हटलं आहे. यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंमुळे हितेंद्र ठाकूर शिवसेनेपासून दूर जाणार ही…

ADVERTISEMENT

काय म्हणाले हितेंद्र ठाकूर?

“मी बेधडक बोलणारा आणि वागणारा माणूस आहे. माझ्या ओठात एक पोटात एक काही नसतं. काही खात्यांमार्फत काही मंत्री न्याय देतात. मी कुणाचं नाव घेत नाही पण काही खात्यांमार्फत मला चांगली मदत झाली पण काहींकडून झाली नाही. १०० टक्के मी नाखुश आहे का? तर तसं मुळीच नाही पण १०० टक्के खुश आहे का ? तर त्याचंही उत्तर नाही हेच आहे.”

हे वाचलं का?

”ग्लास अर्धा भरलेला की ग्लास रिकामा हे तत्वज्ञान मलाही कळतं. मी अर्ध्या भरलेल्या ग्लासकडेही अर्धा भरलेला ग्लास म्हणूनच पाहतो. मी नेहमी रिकामं बघत नाही. मात्र काही खात्यांनी ग्लास अर्धाच केला असेल तर आम्ही गप्प बसू शकत नाही. जे आमचं होतं ते काढण्याचाही प्रय़त्न केला गेला. ”

राज्यसभा निवडणूक: मनसेच्या एकमेव आमदाराने सांगितलं कोणाला करणार मतदान!

ADVERTISEMENT

तुमची ही तक्रार नगरविकास खातं आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आहे का? हे तुम्ही बेधकडपणे सांगून टाका असं मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी विचारलं असता १०० टक्के असं उत्तर हितेंद्र ठाकूर यांनी दिलं आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही येत नाही. मी हे मानणारा आहे की मी आजवर अनेक निवडणुका लढलो, माझ्या विरोधकांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला ते त्यांचं कामच आहे. मात्र अधिकाऱ्यांमार्फत कॉर्पोरेशन किंवा कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणं शक्य नसतं हे दुर्दैवाने काही लोकांना कळत नाही. आपल्या मर्जीतील आणि आपल्या हातातली बाहुली असली की आम्ही जिंकू असं काहींना वाटतं.

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? आमदारांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात?

आम्ही अधिकाऱ्यांना आणलं आणि लोकांना छळलं या जोरावर मतं मिळत नाही. त्यामुळे मी त्या विषयांना घाबरत नाही असंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. हा सगळा विषय तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितला ? असं विचारलं असता हितेंद्र ठाकूर म्हणाले, कोव्हिड काळात २ वर्षे गेली, त्यात मी त्यांना भेटलो नाही. तक्रारी करणं हे माझं काम नाही. जे राज्यकर्ते असतात त्यांना मंत्रिमंडळात काय चालतं ते माहित असतं.

पाहा हितेंद्र ठाकूर यांची मुलाखत

एकदा युद्धात उतरलं की सगळ्या गोष्टी वापराव्या लागतात. शिखंडीला पुढे करायचं, कधी नरो वा कुंज रोवा असं म्हणणं या सगळ्या नीतीच आहेत असंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. माझी भूमिका अजिबात नरो वा कुंज रोवा… असणार नाही. महाविकास आघाडी आम्हाला गृहित धरणार का? वेळ आली तर आम्ही तटस्थ राहू शकतो. पण मला मताची किंमत चांगलीच ठाऊक आहे असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. माझ्याकडे सगळे पर्याय खुले आहेत. मी तटस्थ राहणार नाही, तटस्थ राहून मत वाया घालवणार नाही. असंही हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT