धक्कादायक ! दुचाकी अडवत महिलेला कारमध्ये टाकलं, बलात्कार करत काढले अश्लील फोटो, नाशिक हादरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात गेल्या आठवडाभरात बलात्काराच्या विविध घटना घडत असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे वातावरण तापलेलं असताना नाशकातही बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

नाशिक येथील एक महिला दुचाकीवरुन जात असताना नराधमानं आपली चारचाकी गाडी आडवी टाकत महिलेला आपल्या कारमध्ये टाकत तिच्यावर बलात्कार केला. इतकच नव्हे तर आरोपीने पीडित महिलेचे अश्लील फोटो काढले आहेत. ही घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा शिवारात घडली आहे. पुणे, मुंबई, अमरावती, ठाणे या भागात घडलेल्या घटनानंतर नाशिकचं प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

sakinaka Rape case : त्याला सगळी सूट देऊया! काय?; अभिनेत्री हेमांगी कवीचा सवाल

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पीडित महिला दुचाकीवरुन जात असताना पंचाळे-कोळपे रस्त्यावर आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. आपला पाठलाग होत असल्याचं लक्षात येताच महिलेने वेगात दुचाकी चालवायला सुरुवात केली. परंतू शहा शिवारात आरोपीने पीडित महिलेला गाठलं. आरोपीने महिलेवर बळजबरी करत तिला आपल्या कारमध्ये टाकत दरवाजे बंद केले. यावेळी महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने महिलेवर कारमध्ये बलात्कार करत तिचे अश्लील फोटोही काढले.

या घटनेबद्दल कुठेही वाच्यता केलीस तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी आरोपीने दिली. यानंतर महिलेने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशांत सांगळे असं या संशयित आरोपीचं नाव असून तो सिन्नर तालुक्यातील माळेगावचा रहिवासी असल्याचं कळतंय. वावी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT