लॉकडाउनचा फटका ! सांगलीची पैलवान संजनावर रोजंदारीवर काम करण्याची वेळ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका संपूर्ण राज्याला बसलाय. अनेकांनी या लाटेत आपले रोजगार गमावले, ज्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांना मिळेल ते काम करावं लागत आहे. या लॉकडाउनचा फटका खेळाडूंनाही बसलाय. खेलो इंडिया स्पर्धेत आश्वासक कामगिरी करुन पदकांची लयलूट करणारी सांगलीची पैलवान संजना बागडी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु रहावा यासाठी रोजंदारीवर काम करतेय. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची लाट […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका संपूर्ण राज्याला बसलाय. अनेकांनी या लाटेत आपले रोजगार गमावले, ज्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांना मिळेल ते काम करावं लागत आहे. या लॉकडाउनचा फटका खेळाडूंनाही बसलाय. खेलो इंडिया स्पर्धेत आश्वासक कामगिरी करुन पदकांची लयलूट करणारी सांगलीची पैलवान संजना बागडी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु रहावा यासाठी रोजंदारीवर काम करतेय.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची लाट आल्यामुळे बहुतांश ठिकाणी कुस्तीची मैदानं बंद आहेत. महाराष्ट्र केसरी तसेच गावोगावी होणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धाही बंद असल्यामुळे अनेक मल्लांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आलाय. सांगली जिल्ह्यातल्या तुंग येथील १२ वी मध्ये शिकणारी पैलवान संजना बागडी ही देखील सध्या कुटुंबासोबत शेतात रोजंदारीवर शेतमजुर म्हणून काम करते आहे. संजनाचं कुटुंब हे मच्छिमारीचा व्यवसाय करुन पोट भरतं. परंतू लॉकडाउन काळात बाजारपेठ बंद असल्यामुळे सध्या ३०० रुपये रोजंदारीवर काम करावं लागलंतय. जे हात तालमीतल्या मातीत असणं गरजेचं आहे त्या हातांना लॉकडाउनमुळे शेतात काम करावं लागतंय.










