TET Exam Scam : माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह दोघांना अटक; बीडमधील एकाला बेड्या
राज्यात आरोग्य भरती आणि म्हाडा भरती पेपरफुटीचं प्रकरण गाजत असून, आता टीईटी परीक्षा घोटाळ्याने खळबळ उडवली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन गुण वाढवल्याच्या घोटाळ्याचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपेला अटक केली असून, आता याच प्रकरणात माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. त्याचबरोबर ज्या कंपनीकडून […]
ADVERTISEMENT

राज्यात आरोग्य भरती आणि म्हाडा भरती पेपरफुटीचं प्रकरण गाजत असून, आता टीईटी परीक्षा घोटाळ्याने खळबळ उडवली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन गुण वाढवल्याच्या घोटाळ्याचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपेला अटक केली असून, आता याच प्रकरणात माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. त्याचबरोबर ज्या कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात आली, त्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.
म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर सेलला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून दोन एजंटला अटक केली होती. त्यांच्याच गाडीत पोलिसांना जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितीश देशमुख आढळून आले होते. त्यांच्याकडे प्रश्नपत्रिकेचे सेट आणि परीक्षेशी संबंधित साहित्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून राज्य परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे यांचा यात सहभाग असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
TET Exam scam : तुकाराम सुपेंच्या पत्नीचा डाव फसला! लपवून ठेवलेलं 2.40 कोटींचं घबाड पोलिसांनी शोधलं
सुखदेव डेरे यांना अटक करण्याचं कारण काय?