आता उन्हाळ्याच्या सुट्टीतही सुरू राहणार ऑनलाइन शाळा!
सोलापूर: विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी शिक्षण विभागा आता उन्हाळी सुट्टी कमी करून उन्हाळ्यात दोन तासांचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील वर्षभर कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे. दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली […]
ADVERTISEMENT

सोलापूर: विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी शिक्षण विभागा आता उन्हाळी सुट्टी कमी करून उन्हाळ्यात दोन तासांचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.
मागील वर्षभर कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे.
दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे.
या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन वर्ग घ्यावे लागणार असून त्यादृष्टीने वेळापत्रक तयार केले आहे. लवकरच ते जाहीर केले जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.