Omicron Threat: तज्ज्ञ म्हणतात.. ओमिक्रॉनमुळे भारतात येईल तिसरी लाट, दररोज 2 लाखांपर्यंत सापडतील रुग्ण!

मुंबई तक

Omicron threat: कोरोनाचा सर्वात संसर्गजन्य व्हेरिएंट Omicron चे रुग्ण आता भारतात वाढू लागले आहेत. हे पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. यानंतर, हा व्हेरिएंट आता सुमारे 100 देशांमध्ये पसरला आहे. बहुतेक युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि यापैकी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Omicron threat: कोरोनाचा सर्वात संसर्गजन्य व्हेरिएंट Omicron चे रुग्ण आता भारतात वाढू लागले आहेत. हे पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. यानंतर, हा व्हेरिएंट आता सुमारे 100 देशांमध्ये पसरला आहे. बहुतेक युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि यापैकी बहुतेक रुग्ण हे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आहेत.

भारतात आतापर्यंत Omicron चे 236 रुग्ण सापडले आहेत. आता हा आकडा दररोज वाढू लागला आहे. केंद्राने राज्यांना सावध करताना सांगितले आहे की, ओमिक्रॉन डेल्टापेक्षा जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो. त्याचा संक्रमण दर पाहून सरकार सतर्क झालं आहे. काही राज्यांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर देखील कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ओमिक्रॉनची वाढती रुग्ण संख्या पाहता देशात आता तिसरी लाट येण्याची शक्यताही आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

वर्षाच्या सुरुवातीला तिसरी लाट येण्याची शक्यता आहे

राष्ट्रीय कोव्हिड-19 सुपरमॉडेल समितीचे सदस्य विद्यासागर यांनी एएनआयला सांगितले की, ‘पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तथापि, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे ती दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी कमकुवत असेल, परंतु तिसरी लाट नक्कीच येईल.’

हे वाचलं का?

    follow whatsapp