काँग्रेसवर विसंबून राहण्यात अर्थ नाही, भाजपविरुद्ध पक्षांनी एकत्र येण्याची गरज- ममता बॅनर्जी
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेलेल्या घवघवीत यशाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. भाजपच्या यशासोबतच उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब या तीन राज्यांत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळेही चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भाजपच्या विरोधक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुक निकालांवरुन भाजपवर टीका करत गंभीर आरोप केला आहे. भाजपला मिळालेलं यश हे जनमत नसून मशिनरीच्या […]
ADVERTISEMENT

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेलेल्या घवघवीत यशाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. भाजपच्या यशासोबतच उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब या तीन राज्यांत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळेही चर्चांना उधाण आलं आहे. अशातच भाजपच्या विरोधक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुक निकालांवरुन भाजपवर टीका करत गंभीर आरोप केला आहे.
भाजपला मिळालेलं यश हे जनमत नसून मशिनरीच्या माध्यमातून मिळालेलं यश आहे. याचसोबत आता काँग्रेसवर अवलंबून राहण्यात अर्थ नसून ज्यांना भाजपविरुद्ध लढायचं आहे त्यांनी आता एकत्र येणं गरजेचं असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयासाठी ओवैसी आणि मायावतींना पद्मविभूषण, भारतरत्न द्या – संजय राऊत
केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन आणि हुकुमशाहीच्या जोरावर त्यांनी काही राज्यांमध्ये विजय मिळवला आहे म्हणून सध्या ते आनंदात आहेत. या जोरावर ते २०२४ ची निवडणुक जिंकतील असं त्यांना वाटत आहे, पण हे इतक सोपं नसेल असं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं. दोन वर्षांनी नेमकं काय होईल हे आताच कसं काही सांगता येईल? भाजप बंगालमध्येही खूप दिखावा करतं. त्यांनी यंदा आम्हाला राज्याचा अर्थसंकल्पही मांडू दिला नाही.