दुर्दैवी घटना! 12 वर्षाच्या मुलासह तिघांचा गोदावरीत बुडून मृत्यू; नाशिकमधील घटना

मुंबई तक

मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एका बारा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. गोदापात्रात अंघोळीला उतरल्यानंतर या घटना घडल्या असून, नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीचं पात्र दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच धरणातून विसर्ग होत असल्यानं गोदावरीत न […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एका बारा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. गोदापात्रात अंघोळीला उतरल्यानंतर या घटना घडल्या असून, नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीचं पात्र दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच धरणातून विसर्ग होत असल्यानं गोदावरीत न उतरण्याचा इशारा दिलेला असतानाच तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली आहे. उत्तम नगर येथील महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आलं होतं. महाजन कुटुंबातील रावसाहेब महाजन यांचा अचानक पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले.

या घटनेची माहिती जीवरक्षक जवानांना देण्यात आली. बराच शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह हाती लागला. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या रावसाहेब महाजन यांचा शोध घेत असतानाच जीवरक्षक जवानांना आणखी एक मृतदेह आढळून आला.

नाशिकला पावसाने झोडपलं, रामकुंडावरील मंदिर पाण्याखाली, गोदावरी नदीला रौद्र रुप

रावसाहेब महाजन यांच्या शोधावेळी आढळून आलेला मृतदेह ओवेस नदीम खान यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. तो अठरा वर्षांचा असल्याची माहिती पोलिसांनी तपासाअंती दिली.

तिसऱ्या घटनेत अवघ्या बारा वर्षाच्या साहिल सलीम अन्सारी या मुलाचा मृत्यू झाला आहे. साहिलचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला. नाशिकमधील बुधवार पेठेत राहणारा साहिल घरी न सांगता अंघोळीसाठी गोदापात्रावर आला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला.

गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, गंगापूर-दारणा धरण समुहातून विसर्ग

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वीच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वेगवेगळ्या घटनांत दोन जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नीलेश परदेशी (31) हा नांदगाव येथील पैंजण नदीच्या पुलावरून वाहून गेला होता. दिंडोरी येथील गणेश गुंबडे (वय 22) याचा पालाखेड कालव्यात बुडून मृत्यू झाला. शेतात काम केल्यानंतर गणेश अंघोळीसाठी कालव्यात उतरला होता. लोखंडी रॉडचा मार लागल्याने तो कालव्यात कोसळला आणि मरण पावला.

हे वाचलं का?

    follow whatsapp