मुंबईकरांचं ‘डाळ खिचडी’वर प्रेम; पुणेकरांनी ‘पनीर टिक्का मसाल्या’वर मारला ताव
कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे भारतीयांचा बाहेरचा वावर कमी झाला. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मग ऑनलाईन जेवण मागवण्याकडे कल वाढला. विविध कंपन्यांनी भारतीयांना घरपोच जेवण पुरवलं. हा बाजार सध्या तेजीत असून, भारतीयांनी विशेषतः महत्त्वाच्या महानगरात राहणाऱ्या लोकांनी नेमकं मागवलं काय? या प्रश्नाचं उत्तर मिळालंय… ऑनलाईन फूड डिलीव्हरी करणाऱ्या ‘स्विगी’ने भारतामधील प्रमुख शहरांमध्ये लोकांनी कोणत्या […]
ADVERTISEMENT

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे भारतीयांचा बाहेरचा वावर कमी झाला. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मग ऑनलाईन जेवण मागवण्याकडे कल वाढला. विविध कंपन्यांनी भारतीयांना घरपोच जेवण पुरवलं. हा बाजार सध्या तेजीत असून, भारतीयांनी विशेषतः महत्त्वाच्या महानगरात राहणाऱ्या लोकांनी नेमकं मागवलं काय? या प्रश्नाचं उत्तर मिळालंय… ऑनलाईन फूड डिलीव्हरी करणाऱ्या ‘स्विगी’ने भारतामधील प्रमुख शहरांमध्ये लोकांनी कोणत्या खाद्यपदार्थांना पसंती दर्शवली याचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
ज्यात भारतीयांनी आश्चर्यकारकरित्या पिझ्झा-बर्गर किंवा इतर पाश्चिमात्य डीशऐवजी अस्सल भारतीय पदार्थांना पसंती दर्शवली आहे. स्विगी या फूड डिलीव्हरी कंपनीच्या अहवालानुसार, देशात सर्वाधिक ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थात बिर्याणीनं नंबर एक कायम ठेवला आहे. यंदाच्या वर्षी ‘स्विगी’कडे प्रति मिनिटाला ११५ बिर्याणी ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. दुसरीकडे मिठाईमध्ये गुलाबजामला भारतीयांनी प्राधान्य दिले. त्यानंतर रसमलाईची ऑर्डर नोंदविली गेली. स्विगीवर पावभाजीच्या २१ लाख ऑर्डर नोंदविल्या गेल्या आहेत.
ग्राहकांच्या वर्षभरातील मागणी आणि डिलीव्हरीचं विश्लेषण करुन स्विगीने हा अहवाल तयार केला आहे. ज्यात सर्वाधिक पसंतीच्या स्नॅक्सच्या यादीत समोसा पहिल्या क्रमांकावर आला आहे. ‘स्विगी’ने यावर्षीच्या डिलिव्हरी ऑर्डरचा विश्लेषणात्मक अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. स्विगी फूड डिलिव्हरी, इन्स्टामार्टवर किराणा, स्विगी जेनी आणि हेल्थहब वर पिक-अप आणि ड्रॉप सेवा यासारख्या सर्व सेवांसाठी प्राप्त ऑर्डरनुसार अहवाल बनविण्यात आला आहे.
जाणून घेऊयात महत्वाच्या शहरात लोकांनी कोणत्या खाद्यपदार्थांना पसंती दर्शवली आहे?