Omicron वेगाने का पसरतोय? WHO ने सांगितली 'ही' तीन कारणं

Omicron वेगाने का पसरतोय? WHO ने सांगितली 'ही' तीन कारणं
why is omicron spreading rapidly among people who told these three reasons(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: जगभरात कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. राजधानी दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये दररोज नवीन रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं समोर येत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे वर्णन डेल्टाच्या तुलनेत अतिशय सौम्य व्हेरिएंट म्हणून केले जात आहे. परंतु त्याच्या प्रसाराचा वेग शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करणारा आहे. दरम्यान, WHO च्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केर्खोव यांनी शुक्रवारी ओमिक्रॉनच्या वेगाने पसरण्याची तीन कारणे सांगितली आहेत.

केर्खोव म्हणाले की, लोकांना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि त्याचे संक्रमण नियंत्रित करण्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाच्या विक्रमी रुग्णांची नोंद झाली आहे जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत 71 टक्क्यांनी जास्त आहे. व्हॅन केर्खोव म्हणाले की, नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट अनेक कारणांमुळे लोकांमध्ये वेगाने पसरत आहे.

'प्रथम, नवीन व्हेरिएंटच्या म्युटेशन व्हायरसला मानवी पेशींशी सहजपणे बांधून ठेवण्यास मदत करतात. दुसरा, नवीन व्हेरिएंटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती टाळण्याची क्षमता आहे. परिणामी, लोकांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणजेच, ज्यांना याआधी संसर्ग झाला आहे किंवा ज्यांना लसीकरण करण्यात आले आहे त्यांनाही पुन्हा या व्हेरिएंटमुळे कोरोनाची लागण होऊ शकते.

Maria van kerkhove (Photo: Reuters)
Maria van kerkhove (Photo: Reuters)

तिसरे कारण सांगताना केर्खोव म्हणाले, 'ओमिक्रॉनमध्ये आम्ही वरच्या श्वसनमार्गामध्ये विषाणूची प्रतिकृती पाहत आहोत, जी डेल्टा किंवा मागील कोणत्याही प्रकारांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कोरोनाचे पूर्वीचे सर्व व्हेरिएंट हे फुफ्फुसातील खालच्या श्वसनमार्गामध्ये रेप्लीकेट होत होते.'

या सर्व कारणांव्यतिरिक्त, सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही आणि मास्कचा वापर नीट केला नाही तर व्हायरस वेगाने पसरतो. सुरुवातीपासूनच तज्ज्ञ लोकांना चांगले व्हेंटिलेशन असलेल्या जागी राहण्याचे आवाहन करत आहेत. बंद ठिकाणी एकत्र राहिल्याने संसर्गाचा धोका वाढतो.

WHO ने सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाचे विक्रमी 95 लाख रुग्ण नोंदवण्यात आली आहे.

why is omicron spreading rapidly among people who told these three reasons
डिझायनर मास्कवरून अजित पवारांच्या सूचना, किशोरी पेडणेकरांचा शुक्रवारी मॅचिंग मास्क, शनिवारी N95 मास्क

मागील 7 दिवसात 6247 मुलांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुलांना फारसा संसर्ग झाला नव्हता. मात्र यावेळी तिसऱ्या लाटेत आणि त्यातही फक्त मागील 7 दिवसात 6,247 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. जी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ज्यामध्ये फक्त गुरुग्रामच्या चंद्रलोक भागात 1 हजारांहून अधिक मुलं संक्रमित झाल्याचं आता समोर आलं आहे.

मुंबईत मागील 24 तासात आढळले तब्बल 20 हजार 971 रुग्ण

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा वेग हा काही केल्या कमी होण्याचं नावच घेत नाहीये. गेल्या 24 तासांमध्ये शहरात 20 हजार 971 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनासमोरची चिंता ही सातत्याने वाढत चालली आहे. त्यातच गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in