PM Narendra Modi यांच्या विमानातल्या या फोटोची एवढी चर्चा का होते आहे?

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेत्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अशात नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा दिवसभर रंगली आहे. अमेरिकेसाठी जेव्हा ते विमानात बसले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोटो पोस्ट केला. हा फोटो रात्रीपासून आज दिवसभर चर्चेत आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेत्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अशात नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा दिवसभर रंगली आहे. अमेरिकेसाठी जेव्हा ते विमानात बसले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोटो पोस्ट केला. हा फोटो रात्रीपासून आज दिवसभर चर्चेत आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी मोदी अमेरिकेला रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत करोना महासाथ, दहशतवाद, हवामान बदल व इतर महत्त्वाचे मुद्दे आपण मांडणार आहोत, असं मोदी म्हणाले. मोदींनी विमानात बसल्यानंतर काम करतानाचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास नरेंद्र मोदी यांनी फोटो शेअर केला.

काय आहे या फोटोत?

दीर्घकाळाचा विमान प्रवासातही काम सुरू आहे. काही महत्त्वाच्या फाईल्स पाहण्यासाठी हा दीर्घकाळाचा प्रवास उपयोगी असतो या आशयाचं ट्विट मोदींनी केलं. त्यानंतर या फोटोवर एकच चर्चा सुरू झाली.

हे वाचलं का?