Yamuna Expressway Accident : नोएडात भीषण अपघात, महाराष्ट्रातील ४ जणांसह ५ जागीच ठार
Yamuna Expressway Accident : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे झालेल्या एका भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील बारामती येथील नागरिकांचा समावेश आहे. ४ महिलांसह एका पुरुषाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. ग्रेटर नोएडातील युमना एक्स्प्रेस वेवर गुरूवारी सकाळी बोलेरो आणि डम्परचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, […]
ADVERTISEMENT

Yamuna Expressway Accident : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे झालेल्या एका भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील बारामती येथील नागरिकांचा समावेश आहे. ४ महिलांसह एका पुरुषाचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
ग्रेटर नोएडातील युमना एक्स्प्रेस वेवर गुरूवारी सकाळी बोलेरो आणि डम्परचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बोलेरो गाडीतून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती येथील ५ जण, तर कर्नाटकातील दोघे प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे लोक आग्र्यावरून नोएडाच्या दिशेने चालले होते.
ग्रेटर नोएडातील जेवर ठाणे हद्दीतील यमुना एक्स्प्रेस वे वरील जेवर टोल नाक्याजवळ बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. पहाटे ५ वाजता ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोघांना जेवरमधील कैलास रुग्णालयात भरती करण्यात आलं. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले.