संजय राऊत यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हे सगळं तर…”
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर राज्यभरात आंदोलन होतं आहे. अशात आता आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत यांची अटक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचं कट कारस्थान आहे हे सगळं जगजाहीर आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. कुडाळ या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली. पत्रा चाळ जमीन घोटाळा […]
ADVERTISEMENT

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर राज्यभरात आंदोलन होतं आहे. अशात आता आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत यांची अटक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचं कट कारस्थान आहे हे सगळं जगजाहीर आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. कुडाळ या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली.
पत्रा चाळ जमीन घोटाळा : संजय राऊत यांना अटक! ईडीची कारवाई, शिवसेनेला मोठा धक्का
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत संजय राऊत यांच्याबाबत?
महाराष्ट्राचा आवाज दाबला जावा यासाठी हे सगळं सुरू आहे. संजय राऊत यांचं अटक हे कटकारस्थान आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जे सोडून गेले त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला होता. गद्दारांनी आम्हाला मिठी मारली होती.. त्यांच्या हातातला खंजीर खुपसला ते आम्हाला कळलं नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. आधी सुरतला गेले त्यानंतर गुवाहाटीला गेले. गद्दारांचं सत्य सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.