सत्तासंघर्ष: ठाकरे-शिंदेंची व्हीपवरुन जुंपली.. जाणून घ्या खरा व्हीप कोणाचा असणार?
आमदार अपात्रतेसाठी नेमका व्हीप कोण असणार यासाठी ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वाद-प्रतिवाद सुरू आहे. जाणून घ्या शिवसेनेचा नेमका व्हीप कसा ठरणार.
ADVERTISEMENT

Supreme Court Judgement: मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचा निकाल दिला. ज्यामध्ये कोर्टाने शिंदे सरकार (Shinde Govt) हे कायम ठेवलं. पण याचसोबत आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष (Speaker of Assembly) घेतील असं म्हणत व्हीप (Whip) आणि राजकीय पक्ष नेमकं कोण हे देखील त्यांनाच ठरवावं लागेल असं म्हटलं आहे. कोर्टाने भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाकडून असा दावा केला जातोय की, खरा व्हीप हा आमचाच आहे. त्यामुळे खरा व्हीप कोण याबाबत आता नवा गुंता तयार झाला आहे. ज्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (after supreme court verdict thackeray shinde group clash over whip knowing who will be the real whip)
माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू होणार: उद्धव ठाकरे
कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘फुटीरांचा व्हीप हा सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू होणार.’
राजकीय पक्ष एकनाथ शिंदे आहेत..: फडणवीस
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेला हा दावा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन खोडून काढला आहे.
व्हीपच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जिथवर व्हिपचा प्रश्न आहे.. त्याबाबत कोर्टाने म्हटलं आहे की, राजकीय पक्ष व्हीप नियुक्त करतं. त्यांनी म्हटलं आहे की, राजकीय पक्षाची ती नाळ तोडता येणार नाही. पण आम्हाला जे समजलं आहे ते खूपच स्पष्ट आहे की, राजकीय पक्ष कोण आहे. तर राजकीय पक्ष एकनाथ शिंदे आहेत. कारण की, निवडणूक आयोगासमोर आम्ही जी मागणी केली होती त्या मागणीच्या आधारे निवडणूक आयोगाने शिंदेंची याचिका मान्य करत राजकीय पक्ष म्हणून त्यांना मान्यता दिली आहे.’