BJPच्या मदतीने मंत्री होताच छगन भुजबळांनी शरद पवारांना सुनावलं.. सगळा इतिहासच काढला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar group minister chhagan bhujbal spoken very harshly sharad pawar bhujbal entire political history sharad pawar
ajit pawar group minister chhagan bhujbal spoken very harshly sharad pawar bhujbal entire political history sharad pawar
social share
google news

Political News Maharashtra: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हा आजवर एकसंध होता. मात्र, अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर आता पक्षातील नेते हे थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत आहेत. छगन भुजबळांसारख्या (Chhagan Bhujbal) ज्येष्ठ नेत्याने तर शरद पवारांचा राजकीय इतिहासच काढला. ‘जेव्हा तुम्ही इतर पक्षातील लोकांना फोडलं तेव्हा त्यांना कसं दु:ख झालं असेल..’ असं म्हणत भुजबळांनी थेट शरद पवारांना त्यांच्या इतिहासाची आठवण करून दिली. (ajit pawar group minister chhagan bhujbal spoken very harshly sharad pawar bhujbal entire political history sharad pawar maharashtra politics update today)

‘साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा वसंतदादांना सुद्धा असंच वाईट वाटलं. साहेब मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर होतो. माता-पिता त्यांना मानत होतो. झाले होतो आमचे ओबीसीसंदर्भात मतभेद.. पण 36 लोक तुमच्याकडे आले मला सुद्धा येणं भाग पडलं. तुम्ही सांगितलं नाही की, तिथे थांबा म्हणून.. मी तुमच्याबरोबर आलो. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब ठाकरे त्यांना सुद्धा असंच वाईट वाटलं.’ असं म्हणत छगन भुजबळांनी शरद पवार यांना त्यांनी केलेल्या राजकीय खेळींची आठवण करून दिली.

छगन भुजबळांचा थेट शरद पवारांवरच आरोप..

‘आम्हाला विचारतात तुम्ही भाजपसोबत कसे गेले? अरे जसे आम्ही शिवसेनेत गेलो तसे भाजपबरोबर गेलो. त्यात नवीन काय? नितीशकुमार पण भाजपसोबत गेले आणि बाहेर आले. जयललिता, नवीन पटनाईक, मेहबुबा मुफ्ती अनेक जण गेले सोबत.’

‘माझं म्हणणं असं आहे की, आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. नागालँडमध्ये तिथल्या एका स्थानिक पक्षाचा मुख्यमंत्री झाला. त्याच्या नेतृत्वाखाली भाजप मंत्रिमंडळात गेला आणि आपले सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना सुद्धा पक्षाने सांगितलं की, तुम्ही भाजपच्या सोबत त्या सरकारमध्ये सामील व्हा.. मग आम्ही सामील झालो तर काय फरक.. 10 तारखेला त्या सगळ्यांचा सत्कार झाला. जे भाजपसोबत मंत्रिमंडळात गेले.. मग आम्हाला पण सांगायचं आहे.. साहेब आमचा सुद्धा सत्कार करा ना.. कशाला तिरस्कार करताय. आम्ही काय चूक केलं?’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Maharashtra Politics : बंडानंतर छगन भुजबळांचा शरद पवार, जयंत पाटलांवर घणाघात

‘मला एकच सांगायचं आहे की, आपली जी विचारधारा आहे ती कायम राहिली पाहिजे. धरसोड वृत्ती राजकारणात चालणार नाही. आम्ही तर निघालो आहोत. साहेबांना वाईट वाटलं हे स्वाभाविक आहे.. दिलीप वळसे-पाटलांपासून ही सगळी मंडळी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं हे.. स्वाभाविक आहे… पण हे का झालं.’

‘लोक म्हणतात त्यांचा फोटो का लावला.. अरे साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा.. आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या असं माझी साहेबांना विनंती आहे. पण ते बाकीचे 2-4.. मला सांगा ही एवढी मंडळी वेडे आहेत का? पक्षाच्या कार्यकर्त्यांना नीट वागवायचं नाही. हाडतूड करायचं..’

‘आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे. सगळ्यांच्या मनात… पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा वसंतदादांना सुद्धा असंच वाईट वाटलं. साहेब मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर होतो. माता-पिता त्यांना मानत होतो. झाले होतो आमचे ओबीसीसंदर्भात मतभेद.. पण 36 लोक तुमच्याकडे आले मला सुद्धा येणं भाग पडलं. तुम्ही सांगितलं नाही की, तिथे थांबा म्हणून.. मी तुमच्याबरोबर आलो.’

‘बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब ठाकरे त्यांना सुद्धा असंच वाईट वाटलं. साहेब.. धनंजय मुंडे इकडे आले. त्यांना घेतलं. त्यावेळेला सुद्धा काका असलेले गोपीनाथराव मुंडे आणि बहीण असलेली पंकजा त्यांच्यासुद्धा डोळ्यात असेच अश्रू आले होते. काय करायचं.. या सगळ्याची पुनरावृत्ती व्हायला लागली.’

‘मला अजूनही सांगायचं आहे साहेब काही बिघडलं नाही.. अजित पवार आणि सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि सगळ्यांसाठी आम्ही काम करणार. महाराष्ट्राच्या भल्यासाठी..’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> NCP: भुजबळ म्हणाले बडव्यांनी घेरलं, अमोल कोल्हेंचा पलटवार

‘आम्हा सगळ्यांवरच्या केसेस दूर झाल्या.. कोणावर केस आहेत? कोणावरच नाही.. मग आमच्यावर ठपका नको की, केसेस आहेत म्हणून जात आहोत. साहेब आम्ही गेलो तुमच्या भोवती जे बडवे जमलेले आहेत की, ज्यांनी वाटोळं करण्याचा विडा उचलला आहे त्याच्यासाठी आम्हाला जावं लागलं.’

‘तुम्ही आवाज द्या, बडव्यांना बाजूला करा.. ही सगळी मंडळी जी आहेत पुन्हा एकदा तुमच्याकडे यायला तयार आहेत. तुम्हाला बरोबर घेऊन आपण सरकारच्या माध्यमातून काम करू.. नागालँडला परवानगी दिली आम्हाला पण परवानगी द्या.’

ADVERTISEMENT

‘तुम्ही-आम्ही सगळ्यांनी मजबुतीने वाटचाल करायची आहे. आपल्याला सांगितलं जाईल अपात्र होईल.. हे होईल ते होईल.. काही होणार नाही. अरे आम्हाला सुद्धा कायदे कळतात. आम्ही जे आहोत ते सगळी व्यवस्था करूनच आलो आहोत. म्हणून घाबरायचं कारण नाही.’, असं थेट भाष्य छगन भुजबळांनी यावेळी केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT