अजित पवारांना कार्याध्यक्ष का केलं नाही?, शरद पवारांनी खरं काय ते सांगूनच टाकलं! - Mumbai Tak - ajit pawar is upset working president supriya sule ncp sharad pawar decision new delhi marathi political news - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

अजित पवारांना कार्याध्यक्ष का केलं नाही?, शरद पवारांनी खरं काय ते सांगूनच टाकलं!

अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जागा न देण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. ज्यावर शरद पवार यांनी नेमकं स्पष्टीकरण दिलं आहे.
ajit pawar is upset working president supriya sule ncp sharad pawar decision new delhi marathi political news

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात एक मोठी घोषणा केली. ती म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याची. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. यावेळी अशीही चर्चा सुरू झाली की, अजित पवार (Ajit Pawar) यांना कोणतीच जबाबदारी न दिल्याने ते नाराज झाले आहेत. मात्र, आता या सगळ्या चर्चांबाबत स्वत: शरद पवारांनीच काय ते नेमकं सांगितलं आहे. (ajit pawar is upset working president supriya sule ncp sharad pawar decision new delhi marathi political news)

कार्याध्यक्ष पदाची घोषणा केल्यानंतर शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना अजित पवारांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला.. तेव्हा शरद पवारांनी पक्षात काय सुरू आहे आणि कार्याध्यक्ष पदाचा निर्णय का घेण्यात आला याविषयी नेमकं काय ते सांगून टाकलं.

पाहा शरद पवार अजितदादांबाबत नेमकं काय म्हणाले:

‘मला स्वत:ला वाटत होतं की, सगळ्या सहकाऱ्यांवर जबाबदारी द्यावी. पण माझ्या राजीनाम्याचा स्वीकार काही केला नाही. त्यामुळे मला अध्यक्ष म्हणून कायम राहावं लागलं. पण आता इतर राज्यांमधील जबाबदारी घेण्याची गरज आहे. म्हणून सहकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षाची जागा काही खाली नाही.. जेव्हा जागा रिकामी होईल तेव्हा बोलू.’

‘अजित पवार किंवा इतर सहकाऱ्यांबाबत आपण ज्या बातम्या चालवत आहात. त्यात एक टक्केही तथ्य नाही. काही मीडियामध्ये अशा बातम्या आल्या आहेत की, दोन लोकं खुश नाहीत.. एक जयंत पाटील.. जयंत पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. तर अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. आज त्यांच्यावर तिकडची जबाबदारी आहे.’

‘आणि तसंही सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करा याबाबतचा प्रस्तावच अजित पवारांनी दिला होता. तर आता त्यांच्या खुश असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्नच कुठे येतो?’

‘प्रफुल पटेल किंवा सुप्रिया पवार यांची जी निवड करण्यात आली आहे त्यांच्याकडे अशी काही खास जबाबदारी नव्हती. जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळेच कोणी नाखूश आहे खुश आहे या गोष्टी चुकीच्या आहेत. जी इथे निवड झाली ती नावं सर्व सीनियर नेत्यांनी महिन्याभरापूर्वी घेतली होती. ज्याचा निर्णय आज झाला. एका महिन्यापूर्वी याबाबतचा प्रस्ताव माझ्यापुढे आमच्या सहकाऱ्यांनी मांडला होता.’ असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार नाराज असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

शरद पवारांनी कोणाला कोणती जबाबदारी दिली?

  1. प्रफुल पटेल यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देत आहोत. तसंच त्यांच्याकडे मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड गोवा या राज्यांची आणि राज्यसभेची जबाबदारी त्यांच्यावर देत आहोत.
  2. दुसरी जबाबदारी सुप्रिया सुळे संसदेच्या सदस्या यांच्यावर देखील आम्ही कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत आहोत. त्यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला-युवक आणि लोकसभेतील समन्वय याबाबतची जबाबदारी देत आहोत.
  3. सुनील तटकरे नॅशनल जनरल सेक्रेटरी.. त्यांच्याकडे ओडिशा, प. बंगाल तसंच शेतकरी आणि त्यासंबंधी इतर मुद्द्यांची जबाबदारी देण्यात येत आहे.
  4. डॉ. योगानंद शास्त्री यांच्याकडे ऑर्गनायझेशन सेवा दल आणि दिल्लीची जबाबदारी सांभाळतील.
  5. के के शर्मा नॅशनल जनरल सेक्रेटरी असतील. यांच्याकडे उत्तरप्रदेश, उत्तराखंड पंचायत राज ही जबाबदारी असेल.
  6. फैजल जे लक्षद्वीपचे खासदार आहेत. यांच्याकडे तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या राज्याची जबाबदारी असेल.
  7. नरेंद्र वर्मा यांच्याकडे मीडिया आणि आयटी डिपार्टमेंटची जबाबदारी असेल.
  8. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बिहार, छत्तसीगड आणि जम्मू-काश्मिर, कर्नाटक तसंच कामगार आणि अल्पसंख्यांक आणि ओबीसी हे पाहतील.
  9. नसीम सिद्दीकी हे नॅशनल सेक्रेटरी असतील. ज्यांच्याकडे उत्तर प्रदेश, बिहार, गोवा अशी जबाबादार काही जणांकडे देण्यात आली आहे.
Janhvi Kapoor: अ‍ॅडल्ट साइटवर होता जान्हवी कपूरचा फोटो… राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!