'मी त्याचवेळी म्हणालो होतो,...'; शिवसेना दसरा मेळावा निकालावर अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar On Shiv Sena Dasara Melava : मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दिली दसरा मेळावा घेण्याची परवानगी
Ajit Pawar, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Ajit Pawar, Uddhav Thackeray, Eknath Shinde

ठरलं! शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही उच्च न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करत भाष्य केलं.

पुण्यात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, "मी आठवण करून देऊ इच्छितो की, काही दिवसांपूर्वी मी म्हणालो होतो, बीकेसीजवळची जागा शिंदे गटाला देण्यात आली. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या हातात तो अधिकार आहे. त्यांना ती जागा देण्यात आली. त्यावेळी मी म्हणालो होतो की, ती जागा शिंदे गटाला दिली, तर शिवाजी पार्कची जागा सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी जी परंपरा सुरू केलीये. ती शिवसैनिकांना हवीये. शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत."

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, "बाळासाहेबांनी हेही सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे शिवसेनेचं काम बघतील. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठिशी उभे राहा. त्यामुळे मी म्हणालो होतो की, त्यांनी दिली तर ठिक नाही, तर न्यायालयात जाव लागेल. आपल्या देशात न्याय मिळवण्यासाठी आपण न्यायालयात जातो. न्यायालयात शिवसेनेला न्याय मिळाला आहे. मी समाधान व्यक्त करतो. ज्यांना एकनाथ शिंदेंची विचार ऐकायचे, त्यांनी बीकेसीला जावं. ज्यांना उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायचे आहेत, त्यांनी शिवाजी पार्कवर जावं. फक्त मला काळजी आहे माध्यमांची. एका वेळी सभा सुरू झाली तर दाखवायचं कुणाला हा प्रश्न येईल", असा मिश्किल भाष्य अजित पवारांनी केलं.

Ajit Pawar, Uddhav Thackeray, Eknath Shinde
उद्धव ठाकरेंनी मैदान मारलं! शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

शिंदे गटाला झटका, शिवाजी पार्कवर ठाकरेंची होणार सभा

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कवरच होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होणार असं शिवसेनेकडून सांगितलं जात होतं. मात्र, मुंबई महापालिकेकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर याची उत्सुकता वाढली होती. त्यानंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनीही उडी घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Ajit Pawar, Uddhav Thackeray, Eknath Shinde
ठाकरे गटाला हायकोर्टातून मिळाले शिवाजी पार्क; सुप्रीम कोर्टात जाण्याचे केसरकरांचे संकेत

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना आणि सदा सरवणकर यांच्यासह मुंबई महापालिकेची बाजू ऐकून घेतली. मुंबई महापालिकेच्या परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर कडक ताशेरे ओढत न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. २ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा वापर करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in