NCP: ‘सिल्व्हर ओक’वर राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर शरद पवारांचं पुन्हा मोठं विधान, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp committee has rejected resignation sharad pawar has informed leaders that they need time to think about decision
ncp committee has rejected resignation sharad pawar has informed leaders that they need time to think about decision
social share
google news

Sharad Pawar Lastest News: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्याची (Sharad Pawar Resignation) घोषणा केल्यापासून राष्ट्रवादीत एकच खळबळ माजली आहे. काहीही झालं तरी शरद पवार यांनीच अध्यक्ष पदी कायम राहावं यावर कार्यकर्ते आणि नेते ठाम आहेत. त्यातच नव्या अध्यक्षाच्या नेमणुकीसीठी जी समिती नेमण्यात आली होती तिने पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एकमताने निर्णय घेतला. हाच निर्णय शरद पवार यांना सिल्व्हर ओकवर जाऊन कळविण्यातही आला. याचबाबत आता एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. समितीने जो प्रस्ताव पारित केला आहे त्याबाबत आता शरद पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली हे समोर आलं आहे. (although ncp committee has rejected resignation sharad pawar has informed leaders that they need time to think about decision)

शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. एका कार्यकर्त्याने तर राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने त्याला वेळीच रोखण्यात आलं. असं असताना दुसरीकडे समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करून त्यांनी अध्यक्ष पदावर कायम राहावं असा प्रस्ताव पारित केला.

हे ही वाचा >> NCP: शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार, राजीनाम्याच्या निर्णयावर यू-टर्न?

हाच प्रस्ताव घेऊन समितीतील महत्त्वाचे नेते हे सिल्व्हर ओक म्हणजेच शरद पवारांच्या निवासस्थानी गेले होते. जिथे त्यांनी पवारांना प्रस्तावाबाबत माहिती दिली. त्यावेळी पवारांनी नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि यावर नेमका निर्णय घेण्यासाठी विचार करायला थोडा वेळ हवा असल्याचं समितीला कळवलं. म्हणजेच समितीने जरी पवारांना राजीनामा नामंजूर केला असला तरी शरद पवार हे राजीनामा मागे घेणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे पवार नेमका काय निर्णय घेणार याकडेच अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पवार म्हणाले, विचार करायला वेळ द्या: प्रफुल पटेल

दरम्यान, याचबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची जी बैठक झाली त्यात आम्ही सर्वानुमते निर्णय घेतला की शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं. त्यामुळे त्यांचा राजीनामा आम्ही नामंजूर केला. आम्ही जो प्रस्ताव पारित केला तो प्रस्ताव आम्ही सर्वांनी शरद पवार साहेबांना सादर केला. त्यांना हे सांगितलं की, आम्ही जो प्रस्ताव पारित केला तो आम्ही आपल्याला सादर करत आहोत. आमची इच्छा आहे की, आपण या प्रस्तावाचा आदर करावा.. लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावानांचा आपण आदर करावा.’

‘याबाबत पवार म्हणाले की, मी याविषयी थोडा विचार करतो आणि मी तुम्हाला याबाबत नेमकं काय ते कळवतो.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘फक्त सहा ओळी’,शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या प्रस्तावात काय?

‘त्यांना आपण विचार करण्यासाठी काही तासांचा अवधी तरी दिला पाहिजे. तुम्ही तात्काळ तुमचा निर्णय जाहीर करा असं आपण त्यांना सांगू शकत नाही. आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यांनी देखील आमचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, विचार करण्यासाठी मला थोडा वेळ द्या. तो आपण त्यांना द्यायला हवा.’ असं पटेल यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

साहेब आता अंत पाहू नका… : छगन भुजबळ

याचवेळी छगन भुजबळ म्हणाले की, ‘आम्ही त्यांना सांगितलं की, आपण अंत पाहू नका.. अशी विनंती त्यांना केली. अर्थात त्यांना हा प्रस्ताव दिल्यानंतर विचारासाठी आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यानंतर ते तुमच्याशी बोलतील.’

अवघा देश साहेबांच्या निर्णयाची वाट पाहतोय: जयंत पाटील

‘पवार साहेबांनी आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. आम्ही त्यांना हे देखील सांगितलं की, यावर लवकरात लवकर निर्णय केला पाहिजे. देशातील नेते आणि कार्यकर्ते हे त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.’ असं म्हणत जयंत पाटील यांनी सांगितलं की, शरद पवार हे सध्या त्यांच्या निर्णयावर विचार करण्यासाठी काहीसा वेळ घेत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT