BJPचा निरोप बाळासाहेबांनी का धुडकावलेला?, राज ठाकरेंनी सांगितला भन्नाट किस्सा
Raj Thackeray told an amazing story about Balasaheb Thackeray: मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्र आज (23 जानेवारी) राज्याच्या विधानसभेतील (Vidhan Sabha) सेंट्रल हॉलमध्ये बसविण्यात आलं. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी नेहमी प्रमाणेच […]
ADVERTISEMENT

Raj Thackeray told an amazing story about Balasaheb Thackeray: मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्र आज (23 जानेवारी) राज्याच्या विधानसभेतील (Vidhan Sabha) सेंट्रल हॉलमध्ये बसविण्यात आलं. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी नेहमी प्रमाणेच जोरदार फटकेबाजी केली. पण याच भाषणात राज ठाकरेंनी बाळासाहेबांबाबतचा एक भन्नाट किस्साही सांगितला. (balasaheb kicked power for marathi raj thackeray told an amazing story)
1999 साली शिवसेना-भाजपची सत्ता गेली तरीही बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करण्याची संधी ही शिवसेना-भाजपकडे होती. मात्र, त्यावेळी फक्त मराठी मुख्यमंत्री होणार नसल्याचं समजताच बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली असा किस्सा राज ठाकरेंनी विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना सांगितला.
राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा…
‘आज इथे उपस्थित असलेले अनेक जणं आणि उपस्थित नसलेले अनेक जणं ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायला मिळाली. त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होतंय. बाळासाहेबांबद्दल बोलायचं तर.. मला मिळालेला सहवास हा कडेवरचा सहवास आहे, बोट धरून चालतानाचा सहवास, व्यंगचित्र शिकतानाचा सहवास आहे. त्यामुळे सुरुवात कुठून करायची असा प्रश्न आहे.’
‘मी म्हटलं ना.. वारसा हा वास्तूंचा नसतो तो विचारांचा असतो. मी जर का काही जपलं असेल तर तो विचारांचा आहे. माझा जन्म एका कडवट मराठी घरामध्ये झाला आहे आणि एका हिंदुत्ववादी घरामध्ये झाला आहे. हे कडवट मराठीपण मला लहानपणापासून पाहायला मिळालं. बाळासाहेबांच्या बोलण्यातून ऐकायला मिळालं. त्याबाबतीत हा माणूस बाहेर वेगळा, आतमध्ये वेगळा कधीच नव्हता. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगेन.’