राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रात तीन वर्ष पूर्ण : तीन पुस्तकांच्या प्रकाशनाने सेलिब्रेशन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून ३ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आज मुंबईमध्ये राजभवनात हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.

राज्यपाल कोश्यारी यांच्या तिसऱ्या वर्षपूर्ती निमित्त खालील पुस्तकांचे प्रकाशन होणार : 

१. राज्यपालांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीवर आधारित कॉफी टेबल पुस्तक ‘त्रैवार्षिक अहवाल : भगत सिंह कोश्यारी’ (राजभवनातर्फे प्रकाशित अहवाल)

२. ‘लोकनेता भगत सिंह कोश्यारी’ – रविकुमार आराक लिखित चरित्रात्मक मराठी पुस्तक   

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

३. ‘राज्यपाल के रूप में श्री भगत सिंह कोश्यारी के चुनिंदा भाषण’  संकलन – संपादन डॉ मेधा किरीट  

राज्यपाल कोश्यारी यांची वादग्रस्त कारकीर्द :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातील तीन वर्षांची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली. नुकतेच सत्तेतुन पायउतार झालेले महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये सातत्याने नव-नवीन मुद्द्यांवरुन वादांची मालिका पाहायला मिळाली होती. सत्तेत येण्यापूर्वी अगदी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीपासून सुरुवात झाली.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषद या दोन सभागृहांपैकी एका ठिकाणी 6 महिन्यांच्या आत निवडून येणे संविधानिकदृष्ट्या अनिवार्य होते. मात्र,राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांची नियुक्ती रखडवली होती आणि राज्यातील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच कारण सांगत निवडणूक आयोगाला पत्रही पाठवलं होते. तसेच 12 आमदारांची नियुक्ती, कोरोना काळात मंदिर उघडण्यावरुन, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक अशा विविध मुद्द्यांवरुन वाद पाहायला मिळाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT