विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर, फडणवीसांनी MVA ला पुन्हा चारली धूळ!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपने 5 उमेदवार उभे केले होते. हे पाचही उमेदवार निवडून आणण्यात भाजपला यश आलं आहे. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. मात्र, असं असतानाही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय अचूक अशी रणनिती आखली आणि योग्य वेळी महाविकास आघाडी सरकारचा गेम केला. या निवडणुकीसाठी भाजपकडे फक्त चार उमेदवार निवडून येतील एवढेच अधिकृत मतदार होते. पण तरीही पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड यांना उतरविण्यात आलं आणि एकही मत हाती नसतानाही भाजपने आपले पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना निवडून आणलं.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांनी 26 मतांचा कोटा पूर्ण करुन अनपेक्षितरित्या विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरो यांचा अत्यंत धक्कादायक पद्धतीने पराभव झाला.

या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे शेवटच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे या दोन उमेदवारांमध्येच अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांना पहिल्या पसंतीची 22 तर भाई जगताप यांना 19 मतं मिळाली आहेत. यामुळे पहिल्या फेरीत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे शेवटच्या फेरीत काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढाई पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच फडणवीसांचा महाविकास आघाडीला दे धक्का..

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला अनपेक्षितरित्या धक्का दिला होता. त्यांनी आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांना या निवडणुकीत निवडून आणलं होतं. याच निवडणुकीतील रणनितीचा वापर विधानपरिषद निवडणुकीत देखील करण्यात आल्याचं आता दिसून आलं आहे.

ADVERTISEMENT

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला अनेक अपक्ष, घटक पक्षातील आमदारांना मतं दिलं असल्याचं दिसून येत आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेची काही आमदारांची मतं फुटली असल्याची समजतं आहे.

ADVERTISEMENT

Vidhan Parishad Election : पाचही उमेदवार विजयी, राज्यात ही परिवर्तनाची नांदी-फडणवीस

कोणी-कोणी मिळवला विजय?

विधान परिषद निवडणुकीचा निकालात भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत.

  1. शिवसेना: आमश्या पाडवी आणि सचिन आहिर या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.

  2. राष्ट्रवादी काँग्रेस: एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर विजयी

  3. भाजप: उमा खापरे, प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड हे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.

  4. काँग्रेस: भाई जगताप विजयी झाले आहेत. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला.

आज सकाळपासून ज्या घडामोडी घडत होत्या त्यानंतर उमा खापरे किंवा प्रसाद लाड या दोन उमेदवारांपैकी एकाच उमेदवाराचा विजय होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण भाजपने अतिशय अनपेक्षितपणे आपले पाचही उमेदवार जिंकून आणत या निवडणुकीत काँग्रेसला मागे ढकललं. ज्यामध्ये शेवटच्या फेरीत भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांच्यातच काँटे की टक्कर पाहायला मिळाली. ज्यामध्ये शेवटच्या क्षणी भाई जगताप यांनी बाजी मारली आहे.

या सगळ्यात एक बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे की, बेरजेच्या या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे एकाच महिन्यात दोनदा सरस ठरले आहेत. महाविकास आघाडी दोन्ही वेळा सपशेल फसल्याचं या निमित्ताने समोर आलं आहे.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील निकालांमुळे भाजप अधिक ताकदवान झाल्याचं पाहायला मिळतं आहे. यामुळे या सगळ्याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारच्या बहुमतावर होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT