Shiv Sena UBT: गरीबांची खिचडी खाल्ली तरी कोणी?, सूरज चव्हाणला कोर्टात हजर केलं पण…

मुंबई तक

Suraj Chavan Arrest: खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना ईडीने आज कोर्टात हजर केलं. ज्यावेळी दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद झाला.

ADVERTISEMENT

bmc khichdi scam shiv sena ubt leader suraj chavan produced in court strong argument of ed to get custody
bmc khichdi scam shiv sena ubt leader suraj chavan produced in court strong argument of ed to get custody
social share
google news

Suraj Chavan ED custody: मुंबई: शिवसेना (UBT) चे नेते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर खिचडी घोटाळ्यावरून वाद-प्रतिवादाला सुरुवात झाली. सूरज चव्हाण यांना अटक झाल्यानंतर खिचडी घोटाळा नेमका कसा झाला यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. याच प्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांना कोर्टातही हजर केलं. मात्र, त्यांच्या जामिनावर सध्या कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. (bmc khichdi scam shiv sena ubt leader suraj chavan produced in court strong argument of ed to get custody)

गरीबांची खिचडी नेमकी खाल्ली कोणी?

कोविड काळात परप्रांतीय मंजुरांवर उपासमारीची वेळ आल्याने मुंबई महापालिकेने या मजुरांना मोफत खिचडी वाटप करण्याचा निर्णय घेतला. पण खिचडी वाटप करताना ती 300 ग्रॅमऐवजी 100 ग्रॅमच देण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. ज्यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप करत सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

EOW न दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यावर ईडीने ECIR दाखल केला ज्यानंतर या सगळ्या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी सुरू झाली.

हे ही वाचा>> Maharani 3 Teaser : ‘महाराणी’ सत्तेच्या खुर्चीवर पुन्हा करणार राज्य, दमदार टीझर रिलीज!

या आर्थिक घोटाळ्यात सूरज चव्हाण लाभार्थी असल्याच्या आरोप ED ने केला आहे. कोविड काळात, गरीब आणि स्थलांतरितांसाठी बीएमसीने खिचडीची व्यवस्था केली होती. पण त्याच्या वाटपात भ्रष्टाचार केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या EOW विभागाने ही तक्रार नोंदवली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp