शिंदे आणि ठाकरे दोन्ही बाजू गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?- दिपाली सय्यद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे काम एकनाथ शिंदे गटाने केले आहे. आपल्या सोबत ४६ आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने केला आहे. एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यापासून राज्यातून विविध प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भानविक ट्विट केले आहे.

”सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू.” अशा आशयाचे ट्विट दिपाली सय्यद (Deepali Sayed Tweet) यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेतील आमदारांना घेऊन अगोदर गुजरात गाठले, त्यानंतर अर्ध्यारात्री आसामला गेले. आसाममधील एका हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबलेले आहेत. तिकडून ते पत्र व्यवहार करत आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मी राजीनामा द्यायला तयार आहे फक्त तुमची भूमिका मला समोर येऊन सांगा. त्यानंतर एकवाथ शिंदेंनी वेळ निघुन गेली आहे असे म्हणत हा प्रस्ताव नाकारला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणानंतर एकवाथ शिंदेंनी खालील प्रतिक्रिया दिली होती.

१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.

ADVERTISEMENT

२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.

ADVERTISEMENT

३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.

४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. ”काल उद्धव ठाकरेंनी जे विधान केलं, ते महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलंय की, एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या एखाद्या आमदाराने मला येऊन सांगितलं, तर राजीनामा देऊन टाकेन. आता त्यांच्यापैकी कुणी परत येऊ शकणार नाही. ही पहिली गोष्ट,”

“दुसरी गोष्ट म्हणजे गुवाहाटीत असलेले एकनाथ शिंदे असा दावा करत आहेत की, त्यांच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांच्या दाव्याला कुणीही आव्हान दिलेलं नाही. आता किती दिवस एकनाथ शिंदे पुढे ढकलणार, हे महत्त्वाचं आहे. माझ्यामते राज्यपाल जोपर्यंत आयसोलेशनमध्ये आहेत, तोपर्यंत हे चालू शकतं. पण ते एकनाथ शिंदेंच्या फायद्याचं आहे का, तर अजिबात नाही,” अशी भिती आंबेडकर यांनी व्यक्त केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT