एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंकडून पक्षप्रमुखपद हिरावून घेऊ शकतात का?, नवीन कार्यकारिणी वैध की अवैध?
महाराष्ट्रात सत्ता काबीज केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी तयार केली आहे. प्रश्न असा आहे की ही कार्यकारिणी कितपत कायदेशीर आहे? यातून उद्धव ठाकरेंच्या हातून पक्षाची कमान हिसकावून घेता येऊ शकते का? एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची नवीन कार्यकारणी […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सत्ता काबीज केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी तयार केली आहे. प्रश्न असा आहे की ही कार्यकारिणी कितपत कायदेशीर आहे? यातून उद्धव ठाकरेंच्या हातून पक्षाची कमान हिसकावून घेता येऊ शकते का?
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची नवीन कार्यकारणी तयार केली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुधीर जोशी, संजय राव, सुभाष देसाई, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंद गीते, आनंदराव अडसूळ, आनंद राव, एकनाथ शिंदे यांचा समावेश होता.
सोमवारी शिंदे यांनी ही कार्यकारिणी बरखास्त करून त्यांच्यावतीने नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पुन्हा नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, शिवाजीराव पाटील, विजय नाहाटा आणि शरद पोंक्षे यांची उपनेतेपदी, तर दीपक केसरकर यांची नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीतून शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांची नियुक्ती केल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून केवळ दोनच नेत्यांना घेतले असून, ते उद्धव ठाकरेंना सोडून सोमवारी एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत.