छत्रपती संभाजे राजेंची संत तुकारामांचा अभंग ट्विट करत सेनेवर टीका?, त्याचा अर्थ काय?
मुंबई: काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपने आपले तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणले. काल झालेल्या चुरशीच्या लढतीत आणि पहाटेपर्यंत चाललेल्या मतमोजणीत भाजपने बाजी मारली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी खास शैलीत ट्विट केले आहे. संभाजी राजेंनी संत तुकाराम महाराजांचा अभंग ट्विट केला आहे. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । […]
ADVERTISEMENT

मुंबई: काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपने आपले तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणले. काल झालेल्या चुरशीच्या लढतीत आणि पहाटेपर्यंत चाललेल्या मतमोजणीत भाजपने बाजी मारली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी खास शैलीत ट्विट केले आहे. संभाजी राजेंनी संत तुकाराम महाराजांचा अभंग ट्विट केला आहे.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
हा अभंग ट्विट करत संभाजी राजेंनी शिवसेनेवरती निशाणा साधला असल्याची टीका आहे. परंतु या अभंगाचा नेकमा अर्थ काय हे जाणून घेऊ. ”वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते.”