नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेला तो आरोप खोटा : छोटा राजनच्या भावाचे स्पष्टीकरण

मला मारण्याची छोटा राजनला सुपारी दिली होती...
Narayan rane - Uddhav Thackeray -
Narayan rane - Uddhav Thackeray - Mumbai Tak

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली होती. तसेच आपल्याला मारण्यासाठी शकीलला, छोटा राजनला सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप राणे यांनी केला होता. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले होते. दरम्यान, नारायण राणे यांच्या या आरोपाचे छोटा राजनचा मामेभाऊ हेमचंद्र मोरे यांनी खंडन केले आहे.

नारायण राणे यांनी छोटा राजनबाबत केलेल्या वक्तव्याचा वास्तविक काहीही संबंध नाही. त्यांनी केलेले विधान पडताळून पाहणे गरजेचे आहे. जर असे कृत्य झाले असते, तर नारायण राणे यांनी त्यावेळीच तक्रार दाखल केली असती. मात्र, अशी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. सोबतच छोटा राजनवर जे आरोप आहेत, त्याचे खटले सध्या न्यायालयात सुरू आहेत. असे असताना राजकीय पुढारी छोटा राजन यांच्या नावाचा वापर करून एकमेकांना लक्ष करण्याचा प्रयत्न करू नये”, अशी विनंतीही मोरे यांनी केली आहे.

ठाकरेंचा समाचार घेताना काय राणे काय म्हणाले होते?

"आम्हाला हिंदुत्व शिकवता आणि हे कसे पाकिस्तानला पंतप्रधानांचा केक कापायला गेले, असं ठाकरे म्हणाले. देशाचे संबंध असतात. जावं लागतं. तुला कळायचं नाही. तुला मुख्यमंत्री पद कळलं नाही. या माणसानं हिंदुत्वाबद्दल तोंड उघडू नये. या माणसाचं बेगडी हिंदुत्व आहे", असं म्हणत राणेंनी ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला होता.

"२०१९ च्या निवडणुकीनंतर भाजपसोबत आले का, नाही. का राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले? उद्धव ठाकरे हा लबाड लांडगा आहे. खोटं बोलतो. एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यातली भाषणं तुम्ही ऐकली असतील. मनोहर जोशींच्या घरावर सदा सरवणकरला हल्ला करायला सांगितलं होतं, असं राहुल शेवाळेंनी सांगितलं होतं", असंही राणे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर आरोप :

"नारायण राणे म्हणाले होते की, मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना सुपारी दिली होती. पण तुझ्या सुपाऱ्याही काही काम करू शकल्या नाही. शकीलला दिली. छोटा राजनला दिली. सुभाषसिंगला दिली. नारायण राणेला मारा. काय झालं. मारलं का कुणी. कुणी आहे का जिवंत आज. उद्धव ठाकरे मी तुला पुरून उरेन. तुला नाही आव जाव बोलणार", असंही राणे म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in