CM शिंदेंची हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा, म्हणाले ‘ही’जबाबदारी सरकारचीच
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाविषयी मोठी घोषणा केली. फ्रेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT

CM Eknath Shinde: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडत विरोधकांचा फोलपणाही त्यांनी दाखवून दिला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे महायुतीच्या काळात कोणती कामं करण्यात आली आणि हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter session) महत्वाच्या विषयांना महत्वाचे स्थान देऊन विदर्भासाठी सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून या सरकारने कसे काम केले आहे ही गोष्टही त्यांनी अधोरेखित केली. यावेळी विदर्भाच्या प्रश्नावर विरोधकांना कोणताही मुद्दा उपस्थित करता आला नाही, त्यामुळे त्याचे सगळे खापर त्यांनी सरकारवर फोडल्याची टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणाविषयीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करत मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कामकाज प्रभावीपणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यावेळी या अधिवेशनामध्ये 17 पैकी 12 विधेयके मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर लोकायुक्त हे सर्वात महत्त्वाचे विधेयकही यावेळी मंजूर करण्यात आले कारण हे विधेयकर जवळपास वर्षभरानंतर सभागृहात मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सभागृहाचे कामकाज प्रभावीपणे चालवल्याबद्दल त्यांनी सभागृहातील दोन्ही नेत्यांचेही त्यांनी आभार मानले.
हे ही वाचा >> ‘…तर जेलमध्ये जाल, मॉब लिंचिंग करणाऱ्यांना थेट फाशीच’, अमित शहांची मोठी घोषणा
सगळ्याचं खापर सरकारवर
विदर्भाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी सांगितले की, विरोधकांनी विदर्भाच्या चर्चा करत असताना त्यांनी सभात्याग केला, पण विदर्भाशी संबंधित एकही मुद्दा त्यांनी उपस्थित करता आला नाही. हीच त्यांची चूक त्यांच्या लक्षात आल्यानंत त्यांनी सगळ्याचं खापर सरकारवर फोडल्याची टीकाही त्यांनी केली.
दीड वर्षात 44 हजार कोटींची मदत
आमच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी अनेक वेळा संकटात सापडले. त्यामुळे आमच्या सरकारने अवकाळी, दुष्काळ, गारपिटीच्या समस्यांवर चर्चा करून शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्यामुळेच आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहत गेल्या दीड वर्षात 44 हजार कोटींच्या मदतीची घोषणा आमच्या सरकारने केल्याचेही त्यांनी सांगितले.










