'अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा..', बाबा आढावा यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

मुंबई तक

Raj Thackeray post after the death of Baba Adhav : बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे.

ADVERTISEMENT

Raj Thackeray post after the death of Baba Adhav :
Raj Thackeray post after the death of Baba Adhav :
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा..',

point

बाबा आढावा यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Raj Thackeray post after the death of Baba Adhav : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार चळवळीचे अग्रणी नेते बाबा आढाव (Baba Adhav) यांचे सोमवारी (दि.8) निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता आणि पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. बाबा आढाव यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांचा “विठ्ठल” गेल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे. कागद, काच, पत्रे वेचणारे मजूर, रिक्षाचालक, सफाई कर्मचारी अशा असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिले. या कामगारांना पेन्शनचा हक्क मिळावा, यासाठी त्यांनी अविरत लढा दिला. त्यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त करणारी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

बाबा आढाव यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकर्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव.

बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतलं. महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की, सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का ? माहित नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे.

हेही वाचा : मुंबई: दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी, बनावट क्राइम ब्रांच अधिकारी अन्... तब्बल 9.30 लाख रुपये उकळले

हे वाचलं का?

    follow whatsapp