Andheri Bypoll : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या निर्णयाबाबत म्हणाले, “महाराष्ट्राची परंपरा…”

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आजचा दिवस गाजला तो भाजपमुळे. मुंबईतल्या अंधेरी पूर्व भागात रमेश लटके यांच्या निधनामुळे पोट निवडणूक पार पडते आहे. भाजपने आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यानंतर विविध प्रतिक्रिया आणि चर्चा होत आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजपच्या या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?

अंधेरीच्या पोट निवडणुकीत उमेदवार ऋतुजा लटकेंनीही आवाहन केलं होतं. रमेश लटके आमचा सहकारी आमदार होता. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या परिस्थितीत शरद पवार, राज ठाकरे आणि आमचे प्रताप सरनाईक यांनीही आवाहन केलं.

भाजप-शिवसेना युतीने उमेदवार दिला होता पण..

महाराष्ट्रात ही पोट निवडणूक पार पडते आहे म्हटल्यावर भाजप-शिवसेना युतीनेही उमेदवार दिला होता. पण महाराष्ट्रात ज्या आमदाराचा मृत्यू होतो त्याच्या घरातला सदस्य निवडणुकाल उभा राहिला तर ती निवडणूक बिनविरोध होते. भाजप शिवसेनेने उमेदवार दिला होतो पण सगळ्यांनी जे आवाहन केलं त्यानंतर माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनीही वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर आम्ही उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर भाजपनं माघार घेण्यचा निर्णय घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल काय सांगितलं?

मुंबईत भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, ऋतुजा लटके यांना भाजप पाठिंबा देत असून, भाजप उमेदवार निवडणूक लढवणार नाही. मुरजी पटेल अर्ज मागे घेत असून, ते अपक्षही लढणार नाहीत, असं बावनकुळे म्हणाले.

ADVERTISEMENT

निवडणूक लढवण्याची आशिष शेलारांची होती भूमिका?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आधीच उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे विरोधात शिंदे गट उमेदवारी देणार की भाजप अशी उत्सुकता होती. मात्र, आशिष शेलार यांनी लगेच मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा केली होती.

ADVERTISEMENT

मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा पक्षाकडून अधिकृतपणे अखेरच्या दिवशी करण्यात आली. मात्र त्यापूर्वीच मुरजी पटेल हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते. मात्र, त्यांना थांबवलं गेलं होतं. पटेल हे शेलारांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळेच आशिष शेलार ही निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT