Rahul Gandhi लग्न कधी करणार? अशी हवी आहे मुलगी…
Rahul Gandhi told when and whom he would marry : जम्मु-काश्मीर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. ते कधी लग्न करणार? त्यांना नेमकी कशी मुलगी हवी? आपल्याला जीवनसाथी कोणासारखा हवा? याबाबत त्यांना अनेकदा प्रश्नही विचारले जातात. मात्र आता स्वतः राहुल गांधी यांनीच या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. याशिवाय त्यांचा […]
ADVERTISEMENT

Rahul Gandhi told when and whom he would marry :
जम्मु-काश्मीर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. ते कधी लग्न करणार? त्यांना नेमकी कशी मुलगी हवी? आपल्याला जीवनसाथी कोणासारखा हवा? याबाबत त्यांना अनेकदा प्रश्नही विचारले जातात. मात्र आता स्वतः राहुल गांधी यांनीच या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
याशिवाय त्यांचा पहिला पगार, डाएट, वर्कआउट, आवडती डिश ते पंतप्रधान झाल्यानंतर कोणती गोष्ट पहिल्यांदा करणार अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर उत्तर दिली आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी फूड चॅनल ‘कर्ली टेल्स’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
राहुल गांधी लग्न कधी करणार?
‘कर्ली टेल्स’च्या कामिया जानी यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांना लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, मी लग्नाच्या विरोधात नाही. माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं ते खूप सुंदर नातं होतं. तुमच्या काही अपेक्षा किंवा चेकलिस्ट आहे का? यावर राहुल गांधी म्हणाले, माझ्यासाठी कोणतीही चेकलिस्ट नाही. पण फक्त एक प्रेमळ आणि बुद्धिमान जीवनसाथी असावा. तो मिळाला की मी लग्न करणार, असं ते म्हणाले.