Advertisement

देवेंद्र फडणवीस: "आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात हे आश्चर्यकारक"

वाचा सविस्तर बातमी, काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेबाबत?
Deputy CM Devendra Fadnavis Reply to Aditya Thackeray About His Comment on Maharashtra As Pakistan Over Foxconn Project
Deputy CM Devendra Fadnavis Reply to Aditya Thackeray About His Comment on Maharashtra As Pakistan Over Foxconn Project

आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात हे तर आश्चर्य वाटण्यासारखं आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातून फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रातून हा प्रकल्प का पळवला महाराष्ट्र काय पाकिस्तान आहे का? याबाबत प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे.

Deputy CM Devendra Fadnavis Reply to Aditya Thackeray About His Comment on Maharashtra As Pakistan Over Foxconn Project
Foxconn Project साठी ठाकरे आणि शिंदे सरकारच्या काळात काय घडलं? असा आहे घटनाक्रम

नेमकं काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

"मला आश्चर्य वाटतं की आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करत आहेत. एकदा कंगना रणौत असं काहीतरी बोलल्या होत्या तर केवढा हंगामा झाला होता. आता आदित्य ठाकरे जर हीच भाषा बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतं"

आदित्य ठाकरे यांनी काय वक्तव्य केलं होतं?

फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेला. त्यावरून आदित्य ठाकरेंनी टीका केली. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवून न्यायला महाराष्ट्र हा काय पाकिस्तान होता का? राज्यात रोजगार येणार होता, तो हिरावून घेतला गेला. महाराष्ट्रातल्या मुलांनी काय चूक केली? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला होता.

तसंच माझ्यावर माझ्या घरातले चांगले संस्कार आहेत त्यामुळे मी नारायण राणेंनी केलेल्या टीकेवर बोलणार नाही असं म्हणत नारायण राणेंच्या वक्तव्यांवरही आदित्य ठाकरेंनी बोलण्यास नकार दिला. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर फॉक्सकॉन वेदांताच्या रूपाने जी गुंतवणूक १०० टक्के येणार होती ती का आली नाही? असाही सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

फॉक्सकॉन वेदांताचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातला गेला. त्यावरून चांगलंच राजकारण सुरू झालं आहे. गेले पाच दिवस हा विषय राज्यात चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी आपल्या भाषणात सगळा घटनाक्रम सांगत हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच अनिल अग्रवाल यांनी गुजरातला नेण्याचं नक्की केलं होतं हे सांगितलं. तर दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते यावरून रोज शिंदे फडणवीस सरकारवर आरोप करत आहेत. आज महाराष्ट्र काय पाकिस्तान होता का? इथून प्रकल्प का पळवला असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मला आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करत आहेत याचं आश्चर्य वाटतं असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in