एकनाथ शिंदेंची बंडखोरी ते भाजपची एन्ट्री! आठ दिवसात काय काय घडलं?
२१ जून रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठलं. शिवसेनेत उभी फूट पडल्यानं थेट सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसात अनेक घटना घडामोडी घडल्या असून या प्रकरणात आता पहिल्यांच भाजपची एन्ट्री झालीये. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदारांच्या बंडखोरीपासून ते देवेंद्र फडणवीस-राज्यपाल भेटीपर्यंत काय घडलं? २० जूनला विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात भाजपचे पाचही आमदार […]
ADVERTISEMENT

२१ जून रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठलं. शिवसेनेत उभी फूट पडल्यानं थेट सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसात अनेक घटना घडामोडी घडल्या असून या प्रकरणात आता पहिल्यांच भाजपची एन्ट्री झालीये. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदारांच्या बंडखोरीपासून ते देवेंद्र फडणवीस-राज्यपाल भेटीपर्यंत काय घडलं?
२० जूनला विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात भाजपचे पाचही आमदार निवडून आले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षात नाराज असलेल्या आमदारांनी आम्हाला मतदान केलं असं सांगितलं. २० जूनच्या रात्रीच राजकीय भूकंप होणार आहे याची कल्पना तेव्हा कुणालाच नव्हती. २१ जूनला तो झाला आणि असा झाला की त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत.
२१ जूनला काय समोर आलं?
शिवसेनेतले क्रमांक दोनचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली एवढंच नाही तर त्यांच्यासोबत काही आमदारही नॉट रिचेबल आहेत असं कळलं. सुरूवातीला दहा आमदार, मग पंधरा आमदार मग २० करत ही संख्या वाढत गेली.हे सगळे जण सुरतमध्ये आहेत ही माहिती समोर आली. महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपाचं केंद्र सुरतमध्ये असल्याची माहिती समोर आली.