‘वाटेल तेवढ्या खोक्यांचा वापर करायचा अन्’, ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं!
Saamana editorial: मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचंड मोठ्या घोषणा केल्या. पण या घोषणा केवळ राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी आहेत. अशी टीका विरोधकांनी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून फडणवीसांना डिवचण्यात आलं आहे. ( devendra fadnavis was heavily criticized by saamana […]
ADVERTISEMENT

Saamana editorial: मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचंड मोठ्या घोषणा केल्या. पण या घोषणा केवळ राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी आहेत. अशी टीका विरोधकांनी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून फडणवीसांना डिवचण्यात आलं आहे. ( devendra fadnavis was heavily criticized by saamana editorial after presenting state budget)
‘सत्तेसाठी वाटेल तेव्हा, वाटेल तेवढय़ा ‘खोक्यां’चा वापर करायचा आणि शेतकरी व जनतेसाठी मात्र निवडणुकीच्या वर्षात तेवढा घोषणांचा सुकाळ करून जनतेला सुखाची स्वप्ने दाखवायची, असेच हे धोरण आहे.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून अर्थसंकल्पावर टीका करतानाच फडणवीसांना देखील डिवचण्यात आलं आहे.
सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
-
पुढच्या वर्षी अर्थात 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस पाडला. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या बहुतांश भागाला गारपीट आणि अवकाळी पावसाचा जो जबर फटका बसला, त्यापेक्षाही फडणवीसांच्या भाषणातील घोषणांचा जोर अंमळ अधिकच होता. शेतातील काढणीला आलेली उभी पिके उद्ध्वस्त करणाऱ्या गारपिटीलाही लाजवेल, अशा शब्दांचा आणि घोषणांचा पेटारा फडणवीसांनी फोडला.
शेतकरी काय, महिला काय, वेगवेगळे जातीसमूह व समाजासाठी नवनवीन महामंडळे काय, रस्ते काय, रेल्वे, विमानतळ, मेट्रोंसाठी निधीच्या घोषणा काय! विविध योजनांसाठी केलेल्या तरतुदी आणि मतदारांना आकर्षित करेल, अशा एक ना अनेक घोषणांचा भडीमार उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणात पाहायला मिळाला. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनेच विधिमंडळात मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून महाराष्ट्राची जी आर्थिक पीछेहाट जनतेसमोर आली, त्याचा जराही मागमूस फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात दिसला नाही. आर्थिक दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.