अजित पवारांना मुख्यमंत्रिपदानं किती वेळा हुलकावणी दिली आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

how many times post of chief minister dodge the ajit pawar
how many times post of chief minister dodge the ajit pawar
social share
google news

Chief Minister Post: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाराजीच्या बातम्या आणि बंड यात काही नवीन नाही. राज्यात 4 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या अजित पवारांची मुख्यमंत्रिपदाची महत्वाकांक्षा कधीच लपून राहिली नाही. मात्र, अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेले अजितदादा मुख्यमंत्री पदापासून कसे दूर राहिले, वेळोवेळी अजितदादांची नाराजी कशी समोर आली याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (how many times post of chief minister dodge the ajit pawar)

आतापर्यंत किती वेळा अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाने दिलीए हुलकावणी?

अजित पवारांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राजकारणात एंट्री घेतली. 1999 मध्ये ते पहिल्यांदा कॅबिनेट मिनिस्टर झाले. तेव्हा त्यांना पाटबंधारे आणि फलोत्पादन ही खाती मिळाली. त्यानंतर 2004 मध्ये अजितदादांची पहिली नाराजी समोर आली. या निवडणुकीत राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. तरीही शरद पवारांनी काँग्रेसशी बोलणी करुन त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्याच्या बदल्यात पवारांनी 2 कॅबिनेट पदं आणि अतिरिक्त राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घेतली.

त्यावेळी अजितदादांना जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या खात्यांवर समाधान मानावं लागलं होतं. तेव्हा अजितदादा म्हणाले होते की, 2004 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडणे ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी चूक होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार यांची महत्वाकांक्षा पुन्हा 2008 साली समोर आली. त्यावेळी उपमुख्यमंत्रिपदी अजितदादांना वगळून छगन भुजबळ यांची वर्णी लागली. त्यानंतर 2010 मध्ये आदर्श घोटाळा समोर आला आणि भुजबळांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. मात्र, या पदासाठी शरद पवारांची पहिली पसंती अजित पवार नसून दुसराच नेता असल्याचं स्पष्ट झाल्यानं ही सल अजितदादांच्या मनात कायम राहिली असेल.

हे ही वाचा>> अजित पवारांमुळे बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना आता ‘दादा’च हवेत!

दरम्यान, 2009 मध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंची राजकारणात एंट्री झाली. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार झाल्या. सुप्रिया सुळेंच्या एंट्रीनं पवारांचा खरा वारसदार अजितदादा नसून सुप्रिया सुळेच आहेत अशी चर्चा सुरु झाली. अजूनही जेव्हा पवारांचा वारसदार कोण, आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास पवार सुप्रिया सुळेंचंच नाव पुढे करतील अशी चर्चा कायमच रंगते.

ADVERTISEMENT

पुढे 2012 मध्ये अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे मोठे आरोप झाले. त्यावेळी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण काही महिन्यांनी पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 2019 मध्ये रोहित पवार राजकारणात आले. त्यांनी कर्जत जामखेडमधून विधानसभेची निवडणूक लढवली. दुसरीकडे अजितदादांनी मुलगा पार्थला मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. रोहित पवारांचा विजय झाला. मात्र, पार्थ पवारांचा पराभव झाला. यावरुनही अजितदादा नाराज झाल्याची चर्चा होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sanjay Raut : शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलनंतरच अजितदादांबद्दल राऊत रोखठोक?

2019 मध्ये निवडणुकांनंतर अजितदादांची नाराजी आणि महत्वाकांक्षा जाहीररित्या समोर आली ती पहाटेच्या शपथविधीनं. अजित पवारांनी फडणवीसांची साथ देऊन भल्या पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीनं अजितदादा परतले आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळीही मुख्यमंत्रिपदानं त्यांना हुलकावणी दिली.

आता 2023 साली राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना पुन्हा एकदा अजितदादा भाजपला साथ देण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांना भाजपसोबत गेल्यास मुख्यमंत्रिपद मिळेल अशाही चर्चा रंगत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्रिपदासाठीच अजितदादा पुन्हा एकदा बंड करणार असल्याचं बोललं जात आहे.

अशाप्रकारे 2004 पासून आतापर्यंत अजितदादांची नाराजी आणि त्यांची महत्वाकांक्षा कधीच लपून राहिली नाही. पण अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? याबाबत तुम्हाला काय वाटतं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT