MLA Disqualification: ठाकरे गटाने दिलेले ‘ते’ 23 पुरावे, जसेच्या तसे, ‘त्या’ आमदारांचं काय होणार?
Shiv Sena UBT MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाने सादर केलेले 23 पुरावे हे मुंबई Tak च्या हाती लागले आहेत. पाहा काय आहेत नेमके पुरावे.
ADVERTISEMENT

Shiv Sena UBT MLA Disqualification मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीत, महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील निर्णयासाठी अतिरिक्त पुरावे सादर करण्याची परवानगी दोन्ही शिंदे आणि ठाकरे गटांना दिली होती.
21 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरू झालेल्या सुनावणीत, उद्धव ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे उलटतपासणी घेतली.
शिवसेना (UBT)ने सादर केलेले पुरावे हे केवळ मुंबई Tak च्या हाती लागले आहेत. ज्यामध्ये ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्र, केंद्रीय निवडणूक आयोगाला (ECI) दिलेलं पत्र, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा ठराव, बातम्यांच्या प्रती, ईमेल, स्क्रीनशॉट आणि WhatsApp मेसेजचे फोटो यांचा समावेश असलेल्या पुराव्यांची मालिकाच सादर केली आहे.
हे ही वाचा>> अन् बाळासाहेबांसाठी नारायण राणे बनले ‘सुरक्षारक्षक’! लोणावळ्यातील बंगल्यातला सांगितला भन्नाट किस्सा
आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना दिलेले पुरावे, जसेच्या तसे
1. 2013 ते 2018 या 5 वर्षांसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये निवड झाली.