कसबा पोटनिवडणूक: पैसे वाटल्याचा Video व्हायरल, मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा ड्रामा

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ravindra Dhangekar is on a hunger strike to protest against the distribution of money by the BJP: पुणे: कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीच्या (By Poll) प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत. मात्र, आता प्रचार संपल्यानंतर भाजपने (BJP) पैसे वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत एक व्हिडीओ देखील काँग्रेसकडून (Congress) शेअर करण्यात आला आहे. याबाबत कसबा आणि चिंचवडमधील एक व्हीडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पैशांची बंडलं आणि भाजपच्या नावच्या स्लीप पाहायाल मिळत आहेत. पण मुंबई Tak या व्हिडीओची पुष्टी करत नाही. मात्र, याच प्रकरणी मतदानाच्या आदल्या दिवशी कसब्यात मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. (kasba by poll video of distribution of money goes viral big drama on day before voting)

हा व्हीडिओ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी व्हायरल केला आहे. दुसरीकडे कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही आरोप केला आहे की, भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जात आहेत. याच्याच निषेधार्थ ते कसबा गणपतीसमोर उपोषणाला देखील बसले आहेत. यावेळी रवींद्र धंगेकरांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी देखील भाजपवर तुफान आरोप केले आहेत.

kasba Peth: हेमंत रासने की रवींद्र धंगेकर, पाच फॅक्टर ठरवणार कोण जिंकणार?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा नेमका आरोप काय?

‘गेले 15 दिवस मी चांगल्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे सर्व नियम पाळून प्रचार केला आहे. गेल्या आठवड्यापासून गिरीश महाजन हे गुन्हेगारांना घेऊन गाडीमध्ये फिरत आहेत. हे आपल्याला टीव्हीवरही पाहायला मिळालं आहे. गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगार दमबाजी करत आहेत. खुनाची धमकी देत आहेत. हे पोलिसांना देखील माहिती आहे.’

‘दुसरीकडे पोलीस माझ्याच कार्यकर्त्यांना 149 ची नोटीस बजावत आहेत. काल पाच वाजता प्रचार थांबला. पण मुख्यमंत्री, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे आठ-आठ वाजता पोलिसांच्या उपस्थितीत प्रचार करत होते.’

ADVERTISEMENT

‘अशा वेळेस पोलीस बघ्याची भूमिका घेत असतील तर हे चुकीचं आहे. पोलिसांच्या उपस्थितीत.. त्यांना सोसायटीच्या बाहेर उभं करून पैसे वाटप करतायेत. हे पण समोर आलं आहे. या प्रकरणी मी सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी देखील चर्चा करणार आहे.’

‘माझ्या कार्यकर्त्यांना काल पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत. हुकूमशाहीच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे. धनशक्तीचा पाऊस सुरू आहे. तो पोलिसांच्या समोर सुरू आहे. पोलीस भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतंय. त्याचा निषेध म्हणून मी इथे बसलो आहे.’ असे गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केले आहेत.

ADVERTISEMENT

Kasba Peth By Poll : हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर; कोणाची किती संपत्ती?

रुपाली ठोंबरेही झाल्या आक्रमक

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे या देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धंगेकर ज्या ठिकाणी उपोषणाला बसले त्याच ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी रुपाली ठोंबरे देखील पोहचल्या आणि त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट केलं.

‘हिंदू-मुस्लिम ऐक्याला ठेच पोहचवणारं हे सरकार आहे. जेव्हा तुम्ही सत्तेत येतात तेव्हा तुम्ही जात-पात न पाहता काम केलं पाहिजे. रवींद्र धंगेकर जिथून निवडून येतात तिथे सगळ्या जाती-धर्माची लोकं आहेत. भाजप म्हणतं की कसबा हा आमचा बालेकिल्ला.. पण कसबा हा कोणाची मक्तेदारी नाही.’

‘देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री असतील यांना हिंदुत्वाचं जे काही सांगतात.. तर तुम्ही लोकांना हिंदुत्व शिकवतात आणि घरामध्ये आमच्या मुस्लिम भावाला घेऊन डान्स करता हे कुठलं हिंदुत्व आहे. हे हिंदुत्व कुठलं आहे. म्हणजे तुम्ही आमच्या लोकांची माथी भडकवता.’ असं म्हणत रुपाली ठोंबरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

ऐन मतदानाच्या दिवशी धंगेकर आणि रुपाली ठोंबरेंनी केलेल्या या आरोपामुळे भाजप मतदानासाठी कशा प्रकारची रणनिती आखणार आणि विरोधकांना कसं उत्तर देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT