Uddhav Thackeray: ‘ठाकरे’ आणि ‘शिवसेना’ या दोन नावांशिवाय जगून दाखवा
ठाकरे आणि शिवसेना या दोन नावांशिवाय जगून दाखवा असं आव्हान आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांना दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा चौथा दिवस आहे. उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आम्ही बाळासाहेब ठाकरे-आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना पुढे […]
ADVERTISEMENT

ठाकरे आणि शिवसेना या दोन नावांशिवाय जगून दाखवा असं आव्हान आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांना दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा चौथा दिवस आहे. उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडले आहेत.
याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आम्ही बाळासाहेब ठाकरे-आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना पुढे नेत आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. अशात शिवसेना भवनावर आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेसंह सोबत गेलेल्या आमदारांना आव्हान दिलं आहे.
काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
जे बाहेर पडले आहेत, ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांनी ठाकरे या आडनावाशिवाय आणि शिवसेना या नावाशिवाय जगून दाखवावं. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कशाला घेता? तसंच शिवसेनेचं नाव तरी कशाला घेता हिंमत असेल तर या दोन नावांशिवाय जगून दाखवा.