Lok Sabha 2024 Opinion Poll : भाजप, काँग्रेस की आप… कोण मारणार बाजी?
Punjab lok sabha 2024 opinion poll : जर काँग्रेस आणि आप इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढले, तर राज्यात इतर पक्षाचा सुफडा साफ करू शकतात. एकत्र लढण्यात अधिक फायदा आहे, असे तज्ज्ञांचेही मत आहे.
ADVERTISEMENT

lok sabha 2024 opinion poll : लोकसभा 2024 निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. यावेळी निवडणुकीचे वातावरण कसे आहे? लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील 13 जागाही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पंजाबमधील राजकीय जाणकारांचे मत काय आहे आणि यावेळी पंजाबच्या राजकारणात कुणाच्या बाजूने वातावरण तयार होत आहे, तेच समजून घ्या…
एबीपी न्यूज सी-व्होटर सर्वेक्षणात काँग्रेस आघाडीवर
एबीपी न्यूज सी-व्होटरच्या नुकत्याच झालेल्या ओपिनियन पोलबद्दल सांगायचं तर, काँग्रेसला पंजाबमध्ये 27 टक्के मतांसह जास्तीत जास्त 5 ते 7 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पार्टी 25 टक्के मतांसह 4 ते 6 जागा जिंकू शकते.
16 टक्के मतांसह भाजपला शून्य ते 2 जागा मिळू शकतात. अकाली दलालाही शून्य ते 2 जागा मिळू शकतात आणि मतांची टक्केवारी 14 टक्के असू शकते. हा सर्व्हे महिनाभरापूर्वीचा असला तरी, आप आणि काँग्रेस हे दोघेही 13 जागांवर स्वतंत्रपणे लढू शकतील. पण हा ओपिनियन पोल घेण्यात आला तेव्हा असे अंदाज व्यक्त केले जात होते की काँग्रेस आणि आप एकत्र लढतील.
भगवंत मान यांनी पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याची केली घोषणा
अलिकडेच भगवंत मान यांनी मोठे विधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आम आदमी पार्टी पंजाबमधील सर्व 13 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यावरून हे जवळपास स्पष्ट झाले आहे की, पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, परंतु या दोघांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास इंडिया आघाडीचे काय होईल हे सांगणे थोडे कठीण आहे.