महामोर्चा: ‘हे लफंगे महाराष्ट्र लुटायला आलेत’, ठाकरेंचा तुफान हल्लाबोल
Uddhav Thackeray Speech: मुंबई: महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) वतीने आज (17 डिसेंबर) मुंबईत महामोर्चाचं (Mahamorcha) आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यपाल हटाव आणि भाजपच्या मंत्र्यांची महापुरुषांबाबतची वादग्रस्त वक्तव्यं या सगळ्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Speech: मुंबई: महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) वतीने आज (17 डिसेंबर) मुंबईत महामोर्चाचं (Mahamorcha) आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यपाल हटाव आणि भाजपच्या मंत्र्यांची महापुरुषांबाबतची वादग्रस्त वक्तव्यं या सगळ्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. (mahamorcha uddhav thackerays storm attack on bjp mahavikas aghadi is aggressive to remove the governor)
‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीए. हे लफंगे आहेत. ते महाराष्ट्र लुटायला आले आहेत.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांसह शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली.
उद्धव ठाकरेंचं महामोर्च्यातील भाषण जसंच्या तसं….
‘बऱ्याच वर्षाने एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा या मोर्चाची घोषणा केली तेव्हा काही जणांनी मला विचारलं की, तुम्ही एवढं चालणार का? तेव्हा मी म्हटलं की, मी एकटाच नाही तर माझ्यासोबत महाराष्ट्रप्रेमी हे नुसतेच नाही तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत.’