महाराष्ट्र भूषण सोहळा: 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवर अमित शाहा म्हणाले, माझं मन…

मुंबई तक

12 Died in Maharashtra Bhushan event: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात तब्बल 12 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ज्यावर गृहमंत्री अमित शाहा यांनी तब्बल 24 तासाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

maharashtra bhushan award amit shah reacts after almost 24 hours on the death of 12 shri members
maharashtra bhushan award amit shah reacts after almost 24 hours on the death of 12 shri members
social share
google news

Amit Shah Tweet: मुंबई: श्री सद्गुरू परिवाराचे सर्वेसर्वा आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना काल (16 एप्रिल) नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, हा पुरस्कार सोहळा भर उन्हात पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो श्री सदस्य आले होते. पण उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघात यामुळे साधारण 100 जणांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने यातील 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 25 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे. आता याच प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तब्बल 24 तासांनंतर ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. (maharashtra bhushan award amit shah reacts after almost 24 hours on the death of 12 shri members)

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे खास दिल्लीहून मुंबईत आले होते. अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार दिला जावा अशी शिंदे सरकारची इच्छा होती. त्यामुळेच अमित शाह देखील त्या विनंतीला मान देऊन खारघर येथे आले होते.

हे देखील वाचा- महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर ‘शोककळा’ : मृत्यू झालेले 11 श्री सदस्य कोण?

या कार्यक्रमाला लाखोंची गर्दी पाहून अमित शाह हे देखील अचंबित झाले होते. यावेळी अमित शाह यांनी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीचं कौतुक केलं होतं. त्यावेळी स्वत: अमित शाहांनी उन्हाच्या झळा सोसत भाषण ऐकत बसलेल्या श्री सदस्यांबद्दल भाष्य केलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp