नवनीत राणांना कोठडीत हीन वागणूक देण्यात आली? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले….
राजद्रोहाच्या कलमाखाली अटकेत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी तुरूंगात हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर आपल्याला खालच्या जातीची असल्याने पाणी दिलं जात नाही, वॉशरूमलाही जाऊ दिलं नाही असाही आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. यासंबंधीचं एक पत्रच नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. आता या […]
ADVERTISEMENT

राजद्रोहाच्या कलमाखाली अटकेत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी तुरूंगात हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर आपल्याला खालच्या जातीची असल्याने पाणी दिलं जात नाही, वॉशरूमलाही जाऊ दिलं नाही असाही आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. यासंबंधीचं एक पत्रच नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. आता या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?
खासदार नवनीत राणा यांनी जे आरोप केले आहेत त्याबाबत मी स्वतः चौकशी केली. त्या म्हणत आहेत तसं काहीही घडलेलं नाही. त्यांना कोणतीही हीन वागणूक देण्यात आलेली नाही. राणा दाम्पत्यावर झालेली कारवाई ही पूर्णपणे कायदेशीर आहे मी याबाबत अधिक काही बोलणार नाही. कारण त्यांनी याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे. यासंदर्भात तथ्यांवर आधारित माहिती आमच्याकडे ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ही माहितीही लवकरच पाठवण्यात येईल” असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.