Maharashtra Politics: अजित पवार की एकनाथ शिंदे… भाजपला कोण ठरतंय डोकेदुखी?
Ajit Pawar and Eknath Shinde: भाजपने सत्ता मिळविण्यासाठी आणि आपलं बहुमत अधिक भक्कम करण्यासाठी अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतलं. पण हेच नेते त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे भाजपला डोईजड होत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियामध्ये सध्या सुरू आहे.
ADVERTISEMENT

Ajit Pawar and Eknath Shinde BJP: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आरोप करून मविआ सरकारमधून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला शिंदे सरकारमध्येच अजित पवारांना घ्यावं लागलं, शिवसेनेच्या (Shiv Sena) हरकतीनंतरही अजित पवारांना अर्थ खातं मिळालं, स्वत:चे आमदार वेटिंग लिस्टवर असतानाही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं स्वागत करावं लागलं, पण पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मात्र शिंदेंनी शिवसेनेला खुश केलं. महायुतीत अजित पवारांचं स्थान काही घटनांमुळे अधोरेखित होऊ लागलं आहे. पण या सगळ्यामुळे भाजपची (BJP) चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. (maharashtra politics dcm ajit pawar or eknath shinde who is giving headache to bjp)
शिंदेंनी परतीचे दोर कापले
भाजपसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामधला सगळ्यात मुख्य फरक आहे तो म्हणजे परतीचे दोर कुणी कापलेत ह्याचा. उद्धव ठाकरेंशी पंगा घेऊन एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे परतीचे दोर पूर्णत: कापले आहेत. पण अजित पवारांनी जरी पक्षावर ताबा, राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा केला असला तरी पवारांशी त्यांनी संबंध तोडलेले नाहीत.
शिंदे-ठाकरेंमध्ये कौटुंबिक किंवा रक्ताचं नातं नाही, दादा-पवारांमध्ये मात्र ते आहे. कौटुंबिक भेटी जरी बाजूला ठेवल्या तरी अजित पवार आपले आमदार-मंत्र्यांना घेऊन शरद पवारांना भेटायला गेले. शिंदे ठाकरेंवर जहरी टीका करतात पण तेच अजित पवार मात्र एक अवाक्षर पवारांविरोधात बोलत नाहीत उलटपक्षी भुजबळ-मुंडे तर शरद पवारांना विठ्ठल म्हणतात.
दुसरीकडे अजित पवारांची महत्वाकांक्षा
शिंदे सरकार आल्यापासून एकनाथ शिंदेंनी आपल्या महत्वाकांक्षेचा बाजार मांडला नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांपेक्षा आपली लोकप्रियता जास्त असल्याची जाहिरातीचा अपवाद वगळल्यास भाजपला आव्हान देणं, साईडलाईन करणं, अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाणं असं कधी शिंदेंनी केलं नाही.