भाजपचं दबावतंत्र! एकनाथ शिंदेंनी घेतली तातडीची बैठक, काय ठरली रणनीती?
मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी आमदार, खासदार आणि नेत्यांची बैठक घेतली. भाजपकडून सुरू असलेल्या दबावतंत्राला उत्तर देण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली.
ADVERTISEMENT

Eknath Shinde Shiv Sena : लोकप्रियतेत देवेंद्र फडणवीसांपेक्षा शिंदेंच नंबर वन आहेत, अशी जाहिरात करून शिवसेनेनं स्वः अस्तित्व दाखवलं. आणि भाजपकडून सुरु असलेल्या दबाबतंत्राला उत्तर देण्यासाठी आता शिवसेनेनं आणखी आक्रमक होण्याचा प्लॅन आखलाय. शिंदेंच्या सेनेनं जशास तसं उत्तर देण्याचा हा प्लॅन ठरला वर्षा बंगल्यावर! शिंदे आणि कीर्तीकरांनी आमदारांना कानमंत्र देण्यात आला. आमदारांना काय सांगण्यात आलं, भाजपला भिडण्याचा प्लॅन काय आणि यातून शिंदेंना साधायचं काय? हेच समजून घेऊ…
एकनाथ शिंदेंचं सरकार येऊन वर्ष होत नाही, तोच भाजप आणि शिवसेनेतील कुरबुरी चव्हाट्यावर आल्यात. भाजप नेत्यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यावरच दावा ठोकल्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे पाच मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठीही एकनाथ शिंदेंवर भाजपचा दबाव असल्याची चर्चा सुरू झाली.
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?
याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे सोमवारी 12 जूनला काश्मीर दौऱ्यावरून मुंबईत परतले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच शिवसेना नेते, मंत्री, आमदारांची वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक घेतली.
एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बैठकीत काय झालं?
याच बैठकीत फाटाफुटीनंतरचा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन कसा साजरा करायचा? निवडणुकांना सामोरं कसं जायचं, याबद्दलचा प्लॅन ठरला. याचवेळी खासदार गजानन कीर्तीकरांनी शिंदेंसमोरच आमदारांना दिलेल्या कानमंत्राची खूप चर्चा आहे.










